Home विदर्भ कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी.

100
0

ईकबाल शेख

वर्धा – आष्टी शहराच्या शेवटच्या टोकावरील मोर्शी, वरूड टी पॉईंट दरम्यानच्या रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या कारने दुचाकी क्रं. एमएच-२७-बीएल-४८५०ला धडक दिल्याने दुचाकी चालक जखमी झाला जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव दिलीप महल्ले रा धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती आहे दुचाकीला धडक दिल्याने कार चालकाने पळ काढला पण त्याला तळेगाव पोलिसांनी अटक केली एम एच ३१ झेड ४५३३ क्रमांकाची कार भरधाव वेगात येत होती या कारने दुचाकीला जोरात धडक दिली कारच्या धडकेत दुचाकी चालक दिलीप महल्ले यांच्या पायाचे हाड मोडले त्यांच्या हातापायालाही दुखापत झाली ही घटना तारीख ४ फेब्रुवारी रोज गुरुवारला दुपारी ११ वाजताच्या दरम्यान घडली सविस्तर असे की दुचाकीस्वार दिलीप महल्ले रा धामणगाव रेल्वे हे त्यांच्या मालकीच्या दुचाकीने धामणगाव येथून आष्टी येथे जात होते .

शहर ओलांडल्यावर मोर्शीच्या दिशेने जाताना विरुद्ध दिशेने येणारी एमएच ३१ झेड ४५३३ क्रमांकाची कार मोर्शी वरूड टी पॉइंटवर येताच कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिली यात दुचाकीस्वार दिलीप महल्ले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या एका पायाचे हाड मोडले कारने प्रवास करणारे तिघेही सुखरूप बचावले कारचालक हे अपघात घडल्याचे पाहून तळेगावच्या दिशेने पळाले ही बाब स्थानिकांच्या नजरेस पडली असता काहींनी आष्टी पोलिसांना माहिती दिली ठाण्यात कार्यरत पोलिस हवालदार विलास राठोड यांनी तळेगाव पोलिसांना फोन करून माहिती दिल्यानंतर तळेगाव टी पॉइंटवर कारला अडविले आणि आष्टी पोलिसांच्या स्वाधीन केले अपघातग्रस्त दिलीप महल्ले यांना प्राथमिक उपचाराकरिता आष्टीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले या रुग्णालयात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होऊ शकली नाही नंतर खाजगी वाहनाने जखमीला अमरावतीच्या रूग्णालयात पाठविण्यात आले पोलिसांनी कारचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.