Home विदर्भ टोल नाक्यावर 15/2/2021 पासुन 100 टक्के टोल हा फास्टॅगव्दारेच

टोल नाक्यावर 15/2/2021 पासुन 100 टक्के टोल हा फास्टॅगव्दारेच

273

कारंजा घाडगे – रविंद्र सखारे

वर्धा –  देशात 15/2/2021 पासुन 100 टक्के टोल हा फास्टॅगव्दारेच घेतला जाणार असुन त्यामुळे वेळेची व इंधनाची बचत आणि सुटया पैशांची डोकेदुखी सुध्दा थांबणार आहे. तसचे वाहन चालकांना टोल प्लाझावर थांबण्याची सुध्दा गरज पडणार नाही. सध्याच्या घडीला देशात राष्ट्रीय महामार्गावर 80 टक्के टोल फि संग्रहण फास्टॅगव्दारे होत आहे. 2021 या नववर्षात आपण जर बाहेर फिरायला जायचा बेत आखला असेल आणि आपल्या वाहनाला फास्टॅग नसेल तर आपल्याला अनेक अडचणीना तोंड दयावे लागेल व आपणास मनस्ताप सहन करावा लागेल. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल प्लाझावर देण्यात येणा-या सवलती सुध्दा फास्टॅग मधुनच देण्यात येत आहे. भारत सरकार ने या आधिच विनाफास्टॅग वाहनांना परतीच्या पावती मध्ये मिळणारी सवलत बंद केली असुन, हि सवलत फक्त फास्टॅगमधुनच टोल फि भरत असल्यास दिल्या जात आहे. तसेच स्थानिक वाहनांना सवलत पास सुध्दा फास्टॅगमधुनच देण्यात येत आहे. फास्टॅग एन.एच.आय.आणि ईतर 22 वेगवेगळया बॅकेव्दारे विीस उपलब्ध आहेत, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 कोढाळी तळेगांव सेक्शन, ओरिएन्टल पाथवेज नागपूर प्रा. लि. ओरिएन्टल टोल प्लाझा कारंजा (घाडगे) येथे NHAI, ICICI Bank, Airtel, Axis Bank, Paytm व ईतर सर्वच बँकांचे फास्टॅग वाहन चालकाच्या सोईसाठी उपलब्ध असुन लावून सुध्दा देण्यात येत आहे. रिचार्ज सुध्दा करून देण्यात येत आहेत. व वाहन धारकांना आपल्या स्वताच्या मोबाईल मधील अॅपमधुन स्वताच्या व ईतरांच्या वाहनांच्या फास्टॅग ला कसे रिचार्ज करायचे हे सोप्या पध्दतीने प्रात्यक्षिक करून रिचार्ज संबंधीच्या लोकांच्या शंकांचे समाधान करण्यात येत असुन प्रवासी व वाहन चालक समाधानी होउन जात आहे. वाहनाला एकदा फास्टॅग लावल्यानंतर त्याला आपल्या आवश्यकतेनुसार रिचार्ज करावे लागते. ज्या बँकेचे आपण फास्टॅग लावले आहे त्या बॅकेचे आपले खाते असणे अनिवार्य नाही. फास्टॅग आपल्या बँक खात्याशी जोडले जात नाही. फास्टॅग करिता प्रिपेड व्हर्चुअल अकांउट तयार करण्यात येते व याला फोन पे, गुगल पे, युनो, या सारख्या अ पच्या माध्यमातुन त्वरीत रिचार्ज करता येते. ओरिएन्टल टोल प्लाझा येथे सुध्दा स्थनिक रहिवासी यांना सर्व प्रकारच्या सवलती या फास्टॅगव्दारे देण्यात येत आलेल्या आहेत.

One Nation one FASTag हि संकल्पना भारतीय रस्ते परिवहन तसेच महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांची असुन एन.एच.आय.च्या सर्व टोल प्लाझावर 100 टक्के फास्टॅगव्दारेच टोल संग्रहण 15 फेब्रुवारी 2021 पासुन होणे अनिवार्य असल्याचे ओरिएन्टल टोल प्लाझा कारंजा (घाडगे) चे व्यवस्थापक श्री. रविन्द्र वैदय यानी सांगितले तसेच सर्व वाहन धारकांना विनंती करण्यात येते कि, सर्वानी आपल्या आपल्या वाहनाला फास्टॅग लावून घेउन वेळेची, इंधनाची व पैशाची बचत करावी.