
यवतमाळ , दि. २३ :- जमाअत – ए -इस्लामी हिंद, महाराष्ट्र तर्फे राज्यातील बारा कोटी बंधू-भगिनीसाठी दिनांक २२ जानेवारी पासून अंधारातून प्रकाशाकडे या राज्यव्यापी मोहिमेची सुरुवात झाली.

यवतमाळ शहरात जमात ए इस्लामी द्वारे 22 जानेवारी पासून याची सुरुवात झाली.समाजातील सर्व घटकांसाठी मानविय व्यवहार,बंधुभाव,पैग़म्बरानी मानवतेसाठी दिलेले सन्देशाचे हॉर्डिंग,बैनर लाऊन पाम्पलेट वितरण करण्यात येत आहे. शहरातील सर्व जाती धर्म व विविध समाजातील नागरिकांची विशेष भेट घेवून त्यांना ईस्लामच्या आधारभूत मूल्य व सन्देशाची माहिती दिली जात आहे,मानवतेसाठी व शांतिपूर्ण समाजासाठी काय अभिप्रेत आहे,आध्यात्मिक मार्ग,ईश्वर परायणता कशी असावी याचे सन्देश या माध्यमातून दिले जात आहे.या अभियाणाच्या सुरुवातीला जमात चे मुखपत्र असलेल्या शोधन द्वारे अँधारातून प्रकाशाकडे हा विशेषांक खास मराठी वाचकांसाठी शहरात प्रसारित करण्यात आला.पहिल्या दिवशी जमात ए इस्लामीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध समुहातून शहरातील विविध भागात गश्त करून 300 लोकांपर्यंत पोहोचुन त्यांना अभियाणाचे निमन्त्रण लेक्चर दिले.येत्या ३१ जानेवारी पर्यंत हा राज्यव्यापी अभियान मोठ्या शहरापासून छोट्या वस्तीपर्यंत सुरु राहणार आहे. शुक्रवारी हा अभियान सुरु होताच जमात ए इस्लामी हिन्द यवतमाळ द्वारे विविध समाज माध्यमामध्ये व ट्विटर वरून #DarknessToLight,#StateWideCampaign,#InviteToIslam,#January2021_22To_31,#JIHYavatmal हे ट्रेंड सुरु करण्यात आले आहे.कोरोना महारोगाच्या छायेत शारीरिक आंतर पाळताना, समाज महामारी मुक्त करताना, समाजातील विविध क्षेत्रात पसरलेले घनघोर अंधार कसे दूर करता येईल आणि उज्वल वर्तमान व भविष्य साठी अखंड प्रकाश कसा तेजोमय करता येईल यावर या अभियाना दरम्यान भर देण्यात येत आहे.










































