Home जळगाव नुरुद्दीन मुल्लाजी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय भूषण पुरस्कार जाहीर

नुरुद्दीन मुल्लाजी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय भूषण पुरस्कार जाहीर

60
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील कासोदा ता, एरंडोल येथील डॉ. एपीजे कलाम राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार नूरुद्दीन गयासुद्दीन मुल्लाजी यांना औरंगाबाद येथील शब्दगंध समूह प्रकाशन तथा ग्रंथ युवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राष्ट्रीय पुरस्कार आज दिनांक 16 डिसेंबर रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर टीव्ही सेंटर औरंगाबाद येथील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सकाळी 11 वाजता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे परंतु त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळावे अशी त्यांची इच्छा होती ती आज पूर्ण होत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.