Home मराठवाडा डॉ.सुनिल पवार (वैद्यकीय अधिकारी माजलगांव) यांची आयुष भारत बीड जिल्हा आयुर्वेदाचार्य अध्यक्ष...

डॉ.सुनिल पवार (वैद्यकीय अधिकारी माजलगांव) यांची आयुष भारत बीड जिल्हा आयुर्वेदाचार्य अध्यक्ष पदी निवड

51
0

बीड – आयुष भारत बीड जिल्हा आयुर्वेदाचार्य अध्यक्ष पदी डॉ.सुनिल पवार (वैद्यकीय अधिकारी माजलगांव) यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमीर मुलाणी यांनी दिली. संपूर्ण देशात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरातील डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी लढणारे देशातील सर्वात मोठी आयुष भारत संघटना आहे. आयुष भारत संघटनेची कार्य आणि उद्दिष्ट असे आहे आयुष भारत फिरते हॉस्पिटल तसेच औषधांवर संशोधन, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण पुरवणे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण संस्थांची उभारणी करणे, गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे, 24 तास मोफत ॲम्बुलन्स सेवा पुरवणे, डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायावरती त्वरित मदत करणे, डॉक्टरांना वैद्यकीय कायद्याविषयी मोफत सल्ला देणे.

तसेच डॉक्टरांच्या समस्या डॉक्टरांचे विविध प्रश्न यासाठी कार्य करणारी देशातली सर्वांत मोठी आयुष भारत संघटना ओळखली जात आहे. अशी माहिती आयुष भारत बीड जिल्हा आयुर्वेदाचार्य अध्यक्ष डॉ.सुनिल पवार यांनी दिली.