Home विदर्भ भाजपा जिल्हा सचिव पदी शैला मिर्झापुरे यांची नियुक्ती

भाजपा जिल्हा सचिव पदी शैला मिर्झापुरे यांची नियुक्ती

41
0

यवतमाळ -येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर शैला मिर्झापुरे यांची भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा सचिव पदी व प्रभारी, सांस्कृतिक सेल या पदावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी नियुक्ती केली आहे. शैला मिर्झापुरे यांनी आपल्या या नियुक्तीचे श्रेय आ. मदन येरावार, भाजपाचे जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार, भाजपाचे शहर अध्यक्ष प्रशांत यादव यांना दिला आहे.

शैला मिर्झापुरे या आधी लोकमत सखी मंच यवतमाळ, सकाळ मधुरांगन, तनिष्का या नागपूर सारख्या मोठ्या ग्रुप मध्ये त्यांनी जबाबदारी पार पाडून महिलांचे कुशल संघटन निर्माण केले होते. सध्या त्या 7 Ray’s Educare येथे डायरेक्टर पदावर कार्यभार सांभाळत असून संपूर्ण विदर्भात अनेक विषयावर त्या कौन्सिंलगचे कार्य करतात, आपल्या नियुक्तीबाबत बोलतांना शैला मिर्झापुरे यांनी भाजपांच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे आभार व्यक्त करुन आपल्या जबाबदारीला आपले कर्तव्य समजून जबाबदारीला खरे उतरण्याची ग्वाही दिली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल यवतमाळ जिल्ह्यातील विविध महिला संघटनांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून शैला मिर्झापुरे यांचे यवतमाळ जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक संघटनांशी व्यापक जनसंपर्क आहे. त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.