Home विदर्भ मनसेचा दणका…..जिल्हा सामान्य रुग्णालयातील १६० कामगारांना अखेर कामावर घेतले….

मनसेचा दणका…..जिल्हा सामान्य रुग्णालयातील १६० कामगारांना अखेर कामावर घेतले….

113

कोरोना काळात सेवा देणाऱ्या सरकारी रुग्णालयातील कामगारांना अखेर मनसेनेच दिला न्याय….

कामगारांनी मानले मनसेचे आभार….

यवतमाळ – कोरोना काळात अविरत सेवा देणाऱ्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १६० कामगारांना महाविद्यालयाचे अधिष्ठाता कांबळे यांनी कामावरून कमी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या अन्यायाच्या विरोधात या कामगारांनी मनसेकडे धाव घेतली. त्यांना सेवेत ठेवून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याच्या मागणी साठी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात सर्व कामगार न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक सुद्धा दिली होती.त्या अनुषंगाने अखेर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने मनसेच्या दणक्याने काल सर्व कर्मचाऱ्यांना कामावर परत घेत त्यांना न्याय दिला.या वेळी सर्व कामगार खूप भावुक झाले होते.त्यांनी मनसेच्या या पाठपुरावा आणि आंदोलनाचे आभार व्यक्त करत.मनसेने सर्व कामगारांना जो पर्यंत कामावर घेत नाही तो पर्यंत हा लढा सुरूच राहील या सर्वव्यापक भूमिकेचे आभार व्यक्त केले आणि आम्हाला फक्त आणि फक्त मनसेमुळेच न्याय मिळाला अन्यथा जिल्हा रुग्णालय प्रशासन कोणालाही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
अत्यंत भयानक परिस्थितीत सेवा देणाऱ्या म्हणजे कोरोना रुग्णाच्या मृतदेह उचलणे, संडास बाथरूम साफ करणे, त्यांची काळजी घेणे यासह सर्व कायम स्वरूपी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम कमी रोजंदारीत करणाऱ्या या कामगारांना केले होते.अश्या परिस्थितीत त्यांचा सन्मान होणे गरजेचे असतांना तडकाफडकी कामाहुन कमी केले.अश्या परिस्थितीत मनसेने आक्रमक पवित्रा घेत पाठपुरावा करत सर्व कामगारांना काल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. भुयार सर यांच्याशी चर्चा करून सर्व कामगारांची यादी सादर करण्यात आली आणि आज सर्व कामगारांना कामावर पुन्हा रुजू करण्यात आले. सोबतच त्यांचा २ महिन्याचा पगार सुद्धा मनसेच्या प्रयत्नाने त्यांना मागील आठवड्यातच मिळवून देण्यात आला. प्रसंगी बोलताना मनसेचे अनिल हमदापुरे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी मनसे सदैव कटिबद्ध असून बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या भूमिकेनुसार जनतेसाठी लढत राहील असे मत व्यक्त केले. या प्रसंगी मनसेने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कांबळे, अधीक्षक डॉ. भुयार ,अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्झा यांचे आभार मानले.या प्रसंगी मोठ्या प्रमाणात कामगार उपस्थित होते.कामगारांनी मनसे जिंदाबाद म्हणत आपला आनंद व्यक्त केला.या प्रसंगी प्रामुख्याने चर्चेत डॉ. भुयार सर, मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे,यासह शेकडो कामगार युवक महिला उपस्थित होत्या.मनसेच्या आंदोलनात मनसेचे विकास पवार, अमित बदनोरे, अभिजित नानवटकर,शुभम नांदूरकर सह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.