Home विदर्भ फिरते भाजी विक्रेता यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा मिळाला लाभ , “गुरुदेव युवा...

फिरते भाजी विक्रेता यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा मिळाला लाभ , “गुरुदेव युवा संघाच्या प्रयत्नाला यश”

98
यवतमाळ – गेल्या तीन महिन्यापासून भाजी व फळ विक्रेता यांना बँक लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आरोप होते.
भाजी व फड विक्रेते यांना लॉकडाऊनमुळे कामे नसल्याने त्यांना अत्यंत दुःखाचे संकट चालू होते परंतु केंद्र सरकारने भाजी विक्रेता फळ विक्रेता या करता प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणली परंतु बँकेचे व्यवस्थापक यांना लाभ देण्यास टाळाटाळ करत असल्याचे आरोप होते. याची गुरुदेव युवा संघाने दाखल घेत भाजी विक्रेता व फळविक्रेता यांना घेऊन बँकेवर धडक दिली त्यानंतर बँक व्यवस्थापक यांनी लाभार्थ्यांना दहा दहा हजार रुपये लाभदेण्याची सुरुवात केली त्यामुळे भाजी व फड विक्रेत्यांचे पुढील व्यवसाय सुरळीत सुरू झाल्याने आखेर गुरुदेव युवा संघाच्या प्रयत्नाला यश मिळाले. या करता भाजी व फळ विक्रेत्यांनी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांचा सत्कार केला.