Home विदर्भ वर्धा मधील मुथूट फिनकॉर्प या फायनान्स कंपनीवर दरोडा…!

वर्धा मधील मुथूट फिनकॉर्प या फायनान्स कंपनीवर दरोडा…!

75
0

इकबाल शेख 

वर्धा – वर्ध्यातील मुथूट फिनकॉर्प या फायनान्स कंपनीच्या ऑफिसवर दिवसाढवळ्या दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत सोने तारण कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनी दरोडा टाकला. ही घटना सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस घटनास्थळावर पोहोचले असून त्यांच्याकडून तपास करण्यात येत आहे. (Robbery at Muthoot Fincorp office at Wardha)

रोख रक्कम, सोने आणि दुचाकी चोरीला

बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत दरोडेखोर मुथुट फिनकॉर्पच्या कार्यालयात पोहोचले. दरोडेखोरांनी कार्यालयातील 3 लाख 18 हजार रुपयांची रोख रक्कम आणि साडे तीन किलो सोने नेले लुटून नेले. त्यांनी मुथूट फिनकॉर्पच्या एका कर्मचाऱ्याची दुचाकीदेखील चोरुन नेली आहे. (Robbery at Muthoot Fincorp office at Wardha)

वर्धा शहरात खळबळ….!

सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास दरोड्याची घटना घडल्याने वर्धा शहरात खळबळ माजली आहे. लाखो रुपयांचा दरोडा घालून दरोडेखोर पसार झाले आहेत. मुथूट फिनकॉर्पच्या व्यवस्थापनाला गुंगारा देत दरोडेखोरांनी सोने, रोख रक्कम लुटून नेली. मुथुट फिनकॉर्पच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या चेंबर पेटीतून रक्कम लंपास करण्यात आली.