Home बुलडाणा व्हॉट्स अ‍ॅपवर राजपूत समाजाची बदनामी करणारी पोस्ट फॉरवर्ड करणे भोवले .

व्हॉट्स अ‍ॅपवर राजपूत समाजाची बदनामी करणारी पोस्ट फॉरवर्ड करणे भोवले .

261

. ग्रुपचा अ‍ॅडमिन सह पोस्ट फारवर्ड करणाराही अटक .

हनिफ शेख ,

-अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंचरवाड़ी गावातील एका ग्रूपवर एका व्यक्तिने समाजाच्या भावना दुखवेल अशी पोस्ट फारवर्ड करूण राजपूत समाज भड़कविला . त्यामुळे पोलिसांना पोलिस पथक बोलवावे लागले . या घटनेवरुण अंढेरा पोलिसांना ग्रूव एडमिन सह पोष्ट फारवर्ड करणाराली तात्काळ अटक करावे लागले .ही घटना १७ डिसेंबर रोजी अंचरवाड़ी येथे घडली .
अंढेरा पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारी मध्ये नमूद केले की ,अंचरवाडी येथील एक गाव या व्हॉट्स ग्रुपवर अरुण गवई यांनी राजपूत समाजाच्या भावना दुखवेल अशी पोस्ट फारवर्ड टाकली. या पोस्टबद्दल चर्चा सुरू झाल्याने ती राजपूत समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. पोस्ट टाकणार्‍याविरुद्ध तक्रार घेऊन समाजबांधवांनी अंढेरा पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. ही घटना जिल्हाभरात पसरताच समाजबांधवांची गर्दी अंढेरा पोलीस ठाण्यात जमू लागली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगा काबू पथकही तातडीने चिखली आणि अंढेरा पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी अंढेरा गाठून समाजबांधवांची चर्चा केली व कठोर कारवाईचे आश्‍वासन दिले. जिल्हाभरातील पोलीस ठाण्यात समाजबांधवांकडून निवेदने देण्यात येणार आहेत. राजपूत समाजाची बदनामी करणारी पोस्ट गुन्हा दाखल केला असून, तातडीने दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे अंचरवाडीसह तालुक्यातील आणि जिल्हाभरातील राजपूत समाज संतप्त झाला असून, आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोस्ट टाकणारा अरुण रामभाऊ गवई (45) आणि ग्रुपचा अ‍ॅडमिन धम्मपाल कडूबा जाधव (27, दोघेही रा. अंचरवाडी ता. चिखली, जि. बुलडाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
आरोपीला कठोर शासन करा

समाजाची बदनामी करण्याचा प्रकार निषेधार्थ असून, सडक्या मेंदूचे दर्शन आरोपीने घडवले आहे. या व्यक्तीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. अन्यथा महाराणा ब्रिगेडच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराणा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा हिंदू महासभेचे प्रदेश संघटनमंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी दिला .