Home बुलडाणा आणखीन एक बंदूक सापडली आरोपीस अटक ,

आणखीन एक बंदूक सापडली आरोपीस अटक ,

122
0

आणखीन एका बंदुकीसह आरोपीस ठोकल्या बेड्या ,

 

गुन्हे शाखेचे कामगिरी ,

अमीन शाह

बुलडाणा

एका बंदूक सह ताब्यात घेतलेल्या हिमांशू झंवरने चौकशीत आणखी एकाचे नाव सांगितल्याने त्यालाही मलकापुरातून एका बंदूकसह आज अटक करण्यात आली आहे सुरेश भगवान तायडे रा . सालीपुरा , मलकापूर असे त्याचे नाव आहे . स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली . स्थानिक गुन्हे शाखेने 15 डिसेंबर रोजी मोताळ्यात रात्रीतून तीन जणांना घेतले होते . त्यापैकी हिमांशू झंवरकडून 1 पिस्टल व 5 जिवंत काडतुसे जप्त केले होते . चौकशीत त्याने भुसावळवरून दोन पिस्टल आणल्याचे सांगितले व त्यातील एक मलकापूर येथील सुरेश भगवान तायडे याला दिल्याचे सांगितले . या माहितीवरून एलसीबीने आज मलकापूर गाठत सुरेश तायडे याच्या घराची झडती घेतली . एक गावठी पिस्टल अंदाजे किंमत 50000 रुपयांचे मिळून आले . त्याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया , अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत ( खामगाव ) , बजरंग बनसोडे ( बुलडाणा ) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक नागेशकुमार चतरकर , नीलेश शेळके , श्रीकांत जिंदमवार , पोहेकाँ अताउल्लाखान , पो.ना. गजानन आहेर , रघुनाथ जाधव , पोकाँ युवराज शिंदे , सतिश जाधव , वैभव मगर , गजानन गोरले , विजय वारुळे , नदीम शेख , मपोकाँ सरिता वाकोडे , राजू आडवे , चालक राहुल बोर्डे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली .

जिल्ह्यात हा शत्रसाठा आला कुठून ,

गेल्या एक महिन्यात पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातून बंदूक , कर्तृस , तलवार , चाकू , आदी शस्त्र साठा जप्त केला असून संवेदनशील असलेल्या आपल्या जिल्ह्यात एवढा शस्त्र साठा कुठून आला व कशा साठी आला याचा तपास होणे गरजेचे झाले आहे , विशेष उल्लेखनीय म्हणजे बळीराम गीते यांनी गुन्हा शाखेची सूत्रे हाती घेतल्या पासून धडाकेबाज कार्यवाही सुरू असल्याचे दिसत आहे ,