Home मराठवाडा पोस्टातील अनुदान खाते बंद करुन राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे रूपा चित्रक तहसीलदार

पोस्टातील अनुदान खाते बंद करुन राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे रूपा चित्रक तहसीलदार

132

 

परतूर /प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ, विधवा व अपंग योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे अनुदान खाते पोस्टात आहेत अशा लाभार्थ्यांनी त्यांचे पोस्टातील खाते बंद करुन राष्ट्रीयकृत बँकेत नवीन खाते उघडण्याबाबत मा. उपजिल्हाधिकारी जालना यांनी निर्देशित केले आहे. याबाबत संबंधित लाभार्थ्यांना यापूर्वीही व्यक्तीगत पत्र तसेच तलाठी व वृत्तपत्रांच्या माध्यमातून पोस्टाचे खाते बंद करुन राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्याची झेराॅक्स प्रत, आधार कार्ड झेराॅक्स प्रतीसह या कार्यालयास सादर करण्या बाबत अवगत करण्यात आले होते. परंतु अद्यापही काही लाभारर्थ्यांनी पोस्टातील खाते बंद करुन राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून या कार्यालयात सादर केलेले नाही. तरी या द्वारे ज्या लाभार्थ्यांचे खाते पोस्टात आहे अशा सर्व लाभार्थ्यांना प्रशासना मार्फत आवाहन करण्यात येते की त्यांनी अनुदानाचे पोस्टातील खाते बंद करुन नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून बँक खाते क्रमांक व आधार कार्ड झेराॅक्स दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत तहसील कार्यालय परतूर येथे जमा करावे. अन्यथा माहे सप्टेंबरपासून त्यांचे अनुदान बंद करण्यात येणार असल्याचे तहसीलदार रुपा चित्रक यांनी कळविले आहे.