Home बुलडाणा मेरा खुर्द येथे एकच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या

मेरा खुर्द येथे एकच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या

113
0

 

 

 

हनिफ शेख

अंढेरा. प्रतिनिधी.फोटो.

मेरा खुर्द येथे एकाच रात्री तीन ठिकाणी घर फोडण्यात आले. अनिल. दीपक .उदार हे दोघे भाऊ फाट्यापासून अगदी जवळ शेतात राहत असून 26/9/2020/मध्ये रात्री हि घटना घडली 26/9/2020ला दोघे भाऊ सोयाबीन सोंगणी करून नऊच्या दरम्यान जेवण आटपून समोरच्या खोलीत झोपले असताना चोरट्यांनी मागच्या दरवाजाची कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करुन चोरी केली

यावेळी त्यांचे मूळ बाळ
झोपले असताना व रात्रीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दीपक. अनिल .लक्ष्मण उदार यांच्या राहत्या घरा प्रवेश करून पेटीतील गहू मणी व पोत 50000 हजार किमतीची गहू पोत व नगदी बारा हजार चोरून नेले असे एकूण 65हजार रुपये किमतीची चोरी झाली. तसेच जवळच असलेले प्रल्हाद बाबुराव शेवाळे यांचे सुद्धा चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी पेटी व सुटकेस ज्ञानेश्वर भुसारी यांच्या शेतात फेकून दिले परंतु शेवाळे यांच्या पेटी व सुटकेस मध्ये काहीच मिळाले नाही. घरातील साहित्य चोरीला गेली नाही मात्र कडी कोंडा तोडण्यात आला.
तसेच काही अंतरावर अंत्री खेडेकर रस्त्यालागत असलेल्या अनंथा विश्वनाथ वराडे यांचे सुद्धा घर फोडून घरच्या मागच्या दरवाजाने प्रवेश करून त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये चोरून नेले आहे. असे एकूण 65 हजाराचा माल लंपास केला आहे .या घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला दीपक लक्ष्मण उदार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध457.380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्ती पोफळे करीत आहेत.