Home मराठवाडा *संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून द्या लोणीकर यांची मागणी

*संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून द्या लोणीकर यांची मागणी

83
0

 

*प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्याचे तहसीलदारांना आदेश*

परतूर प्रतिनिधी

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावणबाळ विधवा परित्यक्ता अपंग निराधार यासह अनेकांची कोरोना प्रादुर्भावामुळे प्रचंड हाल होत असून या योजनेतील लाभार्थ्यांचा तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे परतूर व मंठा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ मिळवणाऱ्या अनेकांना मागील 4 महिन्याचे मानधन मिळालेले नसून
ही बाब अत्यंत खेदजनक असून या सर्व लाभार्थ्यांना कोरणा प्रादुर्भाव काळात या मदतीची नितांत गरज आहे असेही लोणीकर यावेळी म्हणाले

परतूर तालुक्यातील 7663 तर मंठा तालुक्यातील 9030 लाभार्थ्यांच्या खात्यात मागील 4 महिन्यांपासून मानधनाची रक्कम जमा करण्यात आलेली नाही त्यामुळे या सर्व लाभार्थ्यांची प्रचंड अडचण झाली असून या माध्यमातून वैद्यकीय सुविधा औषधे इत्यादी साठी ज्येष्ठ नागरिकांसह इतर लाभार्थ्यांना नितांत गरज भासत असून अनेक प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत त्या मध्ये परतूर तालुक्यातील 1097 प्रकरणा चा समावेश असून मंठा तालुक्यातील 750 प्रकरणे प्रलंबित असून या प्रकरणांचा तात्काळ आढावा घेऊन ते निकाली काढण्यात यावेत अशा सूचना यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर त्यांनी मंठा व परतूर तहसीलदार यांना दिल्या.पुढे ते म्हणाले की परतूर तालुक्यामध्ये श्रावणबाळ योजना गट – अ मध्ये 2994 लाभार्थी असून, गट – ब मध्ये 3008 लाभार्थी लाभ घेतात, तर इंदिरा गांधी विधवा योजनेचा 197 लाभार्थी लाभ घेतात व अपंग योजनेचा लाभ 115 लोकांना मिळतो त्याच बरोबर संजय गांधी निराधार योजनेत 1643 लाभार्थ्यांना लाभ मिळतो असे एकूण 7957 लाभार्थी परतूर तालुक्यात लाभ घेतात तर मंठा तालुक्यामध्ये श्रावण बाळ योजना गट – अ मध्ये 5905 लाभार्थी, श्रावण बाळ योजना गट ब मध्ये 1617 लाभार्थी तर इंदिरा गांधी विधवा योजना 197 लाभार्थी, इंदिरा गांधी अपंग योजना 115 लाभार्थी, तर संजय गांधी निराधार योजनेत 1643 लाभार्थी लाभ घेतात मात्र गेल्या 4 महिन्या पासूनचे मानधन रखडल्याने या लाभार्थ्यांवर मोठा अन्याय होत असल्याचे म्हंटले असून त्यांना तात्काळ मानधन आदा करण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री लोणीकर यांनी केली असून सदरील बैठकीत परतूर तालुक्यातील 1097 प्रलंबित फाईल तर मंठा तालुक्यातील 750 फाईल तात्काळ निकाली काढण्याचे आदेश आ बबनराव लोणीकर यांनी परतूर मंठा तहसीलदार यांना दिले