Home परभणी मेंढपाळ बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे होणार वाटप

मेंढपाळ बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे होणार वाटप

209

 धनगर साम्राज्य सेनेचा पुढाकार , आ. पडळकर यांचा वाढदिवस

परभणी – धनगर आरक्षण आंदोलनाचे प्रणेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ बांधवांना मास्क ,सॅनिटायझर वाटप व मेंढ्यांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.

धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात. आरक्षण आंदोलनाचे महाराष्ट्राचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात उपक्रम घेऊन साजरा होत आहे .धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. यानिमित्ताने धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने महाराष्ट्र भर समाज बांधवांना मास्क ,सॅनिटायझर वाटप केले जाणार आहेत. त्याचबरोबर मेंढपाळ व महिलांच्या आरोग्याची तपासणी व लसीकरण शिबिरही घेतले जाणार आहे. या मोफत लसीकरण शिबिराचा लाभ घेण्यासाठी मेंढपाळांनी आपापल्या भागातील धनगर साम्राज्य सेनेचे पदाधिकारी व पशुवैद्यकीय विभागातील अधिकार्‍यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनगर साम्राज्य सेनेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रविकांत हारकळ, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आशुतोष शेंडगे,विदर्भ संपर्क प्रमुख श्रीकांत भुजाडे,पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख महादेव बुट्टे,कोकण विभाग संपर्क प्रमुख सौरवं भांड,उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख राहुल धनगर, विद्यार्थी आघाडीचे राम भंडारे आदीसह धनगर साम्राज्य सेना, युवक आघाडी, महिला आघाडी व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी पुढाकार घेत आहेत.