Home बुलडाणा कृषी कन्यानी केले आंबा कलमे बाधंनी चे प्रात्यक्षिक…

कृषी कन्यानी केले आंबा कलमे बाधंनी चे प्रात्यक्षिक…

115
0

हनिफ शेख

अंढेरा .प्रतिनिधी. फोटो.

चिखली.तालुक्यात आंबा या फळाच्या गावरान जातीपासून उत्पादन कमी प्रमाणात मिळते, त्यावर उपाय म्हणून कलम बांधनी उत्पादन वाढीसाठी उत्तम पर्याय आहे. समर्थ कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या मनिषा सुरेश वायाळ हिने मेरा बु|| येथे जाऊन शेतकऱ्यांना आंबा कलम बांधणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले व कलम बांधण्याची पद्धत सांगितली. आंब्याच्या अभिवृद्धी साठी कोय कलम ही साधी व सोपी पध्दत आहे.यापासून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कलम तयार करता येतात.या पद्धतीने कलमा करण्यासाठी मे ते जुलै हा कालावधी उत्तम असतो. या पद्धतीत गाडी वाफ्यावर कोय रुजवून 15 ते 20 दिवसांचे रोप मुळा सगट कोयीसह काढून घ्यावे ,रोपांचा खालचा 7 ते 9 सेंटीमीटरचा भाग ठेवून शेंडा छाटावा कापलेल्या टोकामधून सुमारे 4 ते 6 मिलिमीटर लांबीचा बरोबर मध्ये काप घ्यावा. या पद्धतीनुसार कलमे करावयाची असतात. अश्या पद्धतीने कलम बांधणी याविषयी माहिती दिली. यावर प्राचार्य.नितीन मेहेत्रे,रावे समन्वयक प्रा.मोहजीत सिंग राजपूत , प्रा.राजेश भोयार यांनी मार्गदर्शन केले