Home उत्तर महाराष्ट्र ग्रामीण / शहरी पत्रकारांनो तुम्हाला गृहीत धरण्यात आलंय..

ग्रामीण / शहरी पत्रकारांनो तुम्हाला गृहीत धरण्यात आलंय..

1041

केवळ राबा , फुक्कटमदी…

जगा अडचणीत,
तुम्हाला ही घरदार आहेत,
मग तुमच्याही घरात रोजचे खर्च आहेत की,
मग तुमच्या बातमीसाठी तुमचे कष्ट मेहनत,तुमचा खर्च याबाबत तुम्ही विचार तरी केला का?
किती लोक?
किती नेते?
किती माध्यमे?
किती नेते?
किती सरकारे?
तुमच्या कष्टाबाबत जाणतात हो?
( मी लिहितो मी म्हणतो मी सांगतो हे केवळ कष्टप्रद पत्रकारांसाठी,वतनदार मंडळींनी,आपल्या सोयीसाठी या क्षेत्रात चमकोगीरी करणाऱ्यांसाठी लिहीत नाही,त्यांनी कृपया हा विषय वाचूच नये )
तुमच्या बातमीसाठी तुमचे कष्ट,तुमचा वेळ,तुमचा नेट,तुमच्या फोनचा टोकटाइम सगळं तुमचंच की,मग बातमीसाठी होणारा प्रवास खर्च,इंधनखर्च,बातमी लिहिण्यासाठी तुम्ही घेतलेली पदवी त्यासाठी केलेला खर्च व मेहनतीचा परतावा तरी तुम्हाला मिळतो का?
मग का मिळत नाही?
याला त्यांच्यापेक्षा तुम्ही जबाबदार नाही का?
याबाबत हिमतीने बोलले पाहिजे,
अश्या कित्येक विषयावर विषय निघाला की काही वतनदार म्हणतात अहो पत्रकारिता व्यासंग असतो,तुम्हाला कोण्ही बातमीगिरी करायला लावली?तुमच्या काही हाताला धरून नेले का?आपल्याच क्षेत्रातील काही तथाकथित विद्वान आपल्याला अशी शब्दसुमने शिकवतात,
मग आपण गप्प बसतो,
कधी तरी आपल्या संघटनेच्या अध्यक्षाला विचारले का?
की माझा बातमीसाठी जाताना अपघात झाला तर?
(अस होऊ नये मात्र सांगता येत नाही वेळ कुठूनही येऊ शकते)
मग माझ्या घरादाराच काय होईल?
बातमीबद्दल बातमीच्या परिणामाचा दूरगामी परिणाम भोगताना अपमान दमदाटी,मारहाण झाली तर?
मला माझ्या चॅनल वृत्तपत्राने काढले तर?
मी वयस्कर झाल्यावर मला पेंशन मिळेल का?
आपल्या मेहनतीला बातमीच्या कष्टाला योग्य मोबदला।मिळावा म्हणून तुम्ही लढत का नाही?
जेव्हा एखादी बातमी मिळवताना माझे स्वतःचे 200 रुपये खर्ची झाले बातमीचा छापून आली नाही तर?
किंवा बातमी छापली तर तिचे मानधन केवळ 40 रुपये बातमीसाठी घरचे 200 रुपये खर्च?
हा विचार कोण्ही मांडताना दिसत का?
नाही असं मांडल,की नाक कापत अस म्हणत्यात,
पण त्याला ही हिम्मत करावी लागते भाऊ,
आयुष्यभर पत्रकारितेत राबून जर तुम्ही आजारात अडचणीत दारिद्र्यात आयुष्य जगत असाल तर,तुमच्या साहेबगिरीतील नकली मुखवटा काय कामाचा?
साधा मजूर सुद्धा कष्टाची कमाई मागतो,
मात्र तुम्ही हक्कासाठी कधी बोलणार?
तुम्ही अनेकांच्या आयुष्यात त्याला यश मार्गदर्शन प्रसिद्धी देतात,तो बदलतो
मात्र तुमचं काय होत?
कित्येकांचे प्रश्न मुद्दे घेऊन काम करता तुमच्या संकटात किती जण तुमच्या जवळ असतात?
हे सगळे सवाल तुम्ही स्वतःला विचारा…
नाहीतर पुढच्या पिढीसाठी तुम्ही काय वाढून ठेवणार हे तरी सांगा?

आपला-
राम खुर्दळ
(ग्रामीण पत्रकार)
राज्यउपाध्यक्ष-पत्रकार संरक्षण समिती-महाराष्ट्र….