Home मराठवाडा शेतकऱ्यांना मदत करा – भाजपचे राज्यसरकारला साकडे

शेतकऱ्यांना मदत करा – भाजपचे राज्यसरकारला साकडे

149
0

माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांच्यावतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

अतिवृष्टी व चक्रीवादळ यामुळे मंठा, परतूर ,जालना आणि घनसावंगी यासह आठही तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी दिनांक 10 सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना कळवले जाणार आहे. यासाठी ज्या गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांनी व भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापल्या तहसील कार्यालय येथे उपस्थित रहावे असे कळविण्यात आले आहे.

हे वाचा

निवेदन देण्याची वेळ व स्थळ
मंठा तालुक्यातील निवेदन
वेळ- सकाळी 11 वाजता
स्थळ- तहसील कार्यालय मंठा
घनसावंगी तालुक्यातील निवेदन
वेळ- सकाळी 11 वाजता
स्थळ- तहसील कार्यालय घनसावंगी
वेळ- दुपारी 1 वाजता
स्थळ- तहसील कार्यालय जालना महीला मोर्चा जालना जिल्हा सर्वानी आवर्जून उपस्थित राहावे .असे आवाहन महीला सशक्तीकरण ग्रप जालनाच्या वतीने करण्यात आले आहे.