मराठवाडा

गणेश उत्सवानिमित्त पोलिसांची रंगीत तालीम

Advertisements
Advertisements

जालना /लक्ष्मण बिलोरे

कोरोना विषाणू चे संकट गडद असतानाच पोलिसांवर सार्वजनिक गणेश उत्सवाची जबाबदारी येऊन पडली आहे. गणेश उत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून जालना पोलिसांनी दंगा काबू योजनेचे प्रत्यक्षिक मामा चौक येथे केले आहे, अचानक कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस हातावरचे काम सोडून तात्काळ घटना स्थळ ठिकाणी हजर येऊन बिघडलेल्या परिस्थितीला काबूत आणण्याकरिता दंगा काबू योजना राबवली जाते, पोलीसा कडील ढाल, लाठी, रायफल इत्यादीचा या प्रत्यक्षिक मध्ये उपयोग करून रंगीत तालीम घेतली जाते त्या अनुषंगाने सदरची योजना प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे . जालना जिल्हा पोलीस अधिक्षक यश चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, गणेश झलवार, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक काकडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल परशुराम पवार, गोपनीय शाखेचे रवी देशमुख व पोलीस मुख्यालय येथील आर सी पी प्लाटून सदर बाजार पोलिस स्टेशनचे एकूण 52 कर्मचारी हजर होते व काद्राबाद पोलीस चौकी चे परशुराम पवार यांनी मॉप ड्रिल दंगा काबूचे उत्कृष्ट प्रत्यक्षिक दाखवून जालना पोलीस कुठल्याही परिस्थितीत सतर्क व सज्ज असल्याचे प्रात्यक्षिक करताना दिसून आले.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...
मराठवाडा

अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता – पालकमंत्री राजेश टोपे

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे  पोलिसवाला ऑनलाईन मिडिया जालना –  जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त ...