Home विदर्भ देवळी तालुक्यात भिडीत दोन कोरोणा रुग्ण तर पुलगाव नाचणगाव येथे प्रत्येकी एक...

देवळी तालुक्यात भिडीत दोन कोरोणा रुग्ण तर पुलगाव नाचणगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला.!

270

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील भिडी येथे १८ व १५ वर्षी य पुरुष ग्रामीण रुग्णालयात एन्टीजन किट व्दारे तपासणी पाँजेव्टी निघाले . तर आज पुलगाव नाचणगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने देवळी तालुक्यातील कोरोणा रुग्णात वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे.
भिडी येथील वार्ड नंबर ३ मध्ये एकूत ११ घरे कंटेनमेट झोन करण्यात आले आहे. देवळीचे तहसिलदार राजेश सरोदे तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण धमाने ग्रामीण रुग्णालय डॉ दिनेश राठोड सरपंच सचिन बिरे आरोग्य सेवक दिलीप उटाणे माधव कातकडे आरोग्य सहाय्यक दिपक मेशराम शेख हुसेन ग्रामविकास अधिकारी प्रमोद चौधरी आशा वर्कर प्रतिभा जाधव पोलीस पाटील इत्यादी यावेळी उपस्थिती होते . नागरींकानी स्वतःची काळजी घेणे महत्वाचे असुन वेळोवेळी स्वच्छ हात धुने तोंडाला मास्क बांधूनच बाहेर पडणे, शोसल डिस्टन्स ठेवावे व आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनेनुसार नियम पाळण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅक्टर प्रविण धमाणे यांनी केले आहे.