मुंबई

७ व ८ सप्टेंबरला पार पडणार दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन , “आमदारांची अँटिजन होणार चाचणी”

Advertisements
Advertisements

मुंबई –  विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन दिनांक ७  व ८ सप्टेंबरला होणार आहे. कामकाज सल्लागार समितीने याबाबात आज निर्णय घेतला असून फक्त २ दिवसाचे हे अधिवेशन असणार आहे.

दोन दिवसीय अधिवेशनासाठी दोन्ही सभागृहातील आमदारांची अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सदस्यांना कोरोनापासून सुरक्षितता म्हणून सुरक्षा किट दिले जाईल. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्या आमदारांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे सदस्यांच्या पीएना आतमध्ये प्रवेश मिळणार नाही मात्र त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहनचालकांना देखील बसण्याची तसेच त्यांच्या नाश्ता, चहापाणी स्वतंत्र व्यवस्था सरकारकडून करण्यात येणार आहे.

प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीत देखील शारीरिक अंतराचे नियम पाळून मा सदस्यांची आसन व्यवस्था केली जाणार आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्या आमदारांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच इतरही आजार असलेल्या सदस्यांना त्यांच्या त्यांच्या पक्ष गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना देण्यात येतील.

सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून पावसाळी अधिवेशन होणार आहे. शोक प्रस्ताव, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयकावर चर्चा होणार आहे. यामध्ये ७ शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा समावेश असेल, अशी माहिती विधानमंडळ सचिव ॲड. राजेंद्र भागवत यांनी यावेळी दिली. कामकाज सल्लागार समिती बैठकांना विधानसभा सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, ॲड. आशिष शेलार, अमिन पटेल, सुनील प्रभू, विधान परिषद सदस्य सर्वश्री डॉ. रणजीत पाटील, अशोक ऊर्फ भाई जगताप, विजय ऊर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, कपील पाटील आदी उपस्थित होते.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मुंबई

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे सर्व गट एकत्र व्हावेत – आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया मुंबई , दि. १७ – (प्रतिनिधी) देशासह राज्यात सवर्णांकडून वंचित समूहावर होत ...
मुंबई

अन्याय विरुद्ध लढण्याची धमक भिम आर्मी मध्येच , नेहाताई शिंदे यांचे प्रतिपादन तर दलित , मुस्लिम ओबीसी नी एकत्र यावे – दीपक हनवते चे आव्हान

मुंबई – प्रतिनिधी  देशात सत्ता कुठल्याही पक्षाची असली तरी रोज कुठे ना कुठे दलितांची कुचंबणा ...
मुंबई

मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण द्या – राष्ट्रीय स्वराज्य सेना

 मुंबई – सर्वच्य न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात व नोकरी मध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आरक्षणास स्थगिती ...
मुंबई

किसान सभेच्या मागण्यांसंदर्भात योग्य निर्णय घेऊ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करून पर्यावरणाचे संवर्धनासाठी आणि वनाधिकार कायद्याच्या जलद अंमलबजावणीसाठी घेतली भेट मुंबई ...