Home महाराष्ट्र “निघून जावी एकदाची उगाळ” , करा चौकशी होऊद्या तपासणी खऱ्या खोट्या पत्रकारांची…..!

“निघून जावी एकदाची उगाळ” , करा चौकशी होऊद्या तपासणी खऱ्या खोट्या पत्रकारांची…..!

667

दूध का दूध पाणी का पाणी….

नुकतच सोशल मीडियावर ऐकलं , वाचलं म्हणे press नावाचा सर्रास वापर करणाऱ्या बोगस पत्रकारांवर कारवाई होणार केसेस दाखल होणार अरे बाबांनो कधी करणार? करा की होऊनच जाऊद्या “हा सूर्य आणि हा जयद्रथ” अश्या प्रयत्नांना कोण्ही रोखलं हो केवळ घोषणा नको , आदेश नको कृती करणार कधी? हाच सवाल आमच्या सारख्या सामान्य उपेक्षित पत्रकारांचा आहे. पत्रकारिता माध्यमांत अश्याच काही अपप्रवृत्ती सच्च्या कष्टाळू , मेहनती , प्रेरित पत्रकारितेला बदनाम करीत आहे . अशा विघ्नसंतोषी अपप्रवृत्तीमूळ आज निष्ठावान पत्रकार म्हणून मान सन्मान विश्वास आपण गमावून बसलोय , सरकार व माहिती विभागही आपली दप्तरी नोंद घेत नाही की आपल्याला कुठलेही संरक्षण , पेंशन , कष्टाचा मोबदला मिळतो कुठं??
ग्रामीण व शहरी कित्येक पत्रकारांना अधिस्वीकृती मिळत नाही. केवळ राब – राब राबतोय मात्र हाती काय?प्रसंगी पत्रकारांच्या उपेक्षेला ही या क्षेत्रात केवळ मिरवायला आलेली बोगस लोकांमुळे ग्रहण लागलय , ( अनेकांना खटकेल ) मात्र हेच कबूल करा हेच खरंखुरं वास्तव आहे. आपल्या माध्यम क्षेत्रातील बोगसगिरी संपली की आपल्या हक्काचा लढा कुठंतरी सरकार दरबारी जाईल. नाहीतर जीवघेण कष्ट , अडचणीत , असुरक्षित जगणं , राब – राब राबन , त्याबदल्यात कित्येक यातना भोगन आपल्याला सुटणार नाही. लक्ष्यात ठेवा , विचार करा म्हणून ही मांडणी करतोय.
एखादे क्षेत्र ज्या उद्देशाने निर्माण होते त्या उद्देशाला हरताळ फासून त्याच्या कार्यात त्या मार्गात केवळ स्वार्थासाठी मिरवायला आलेल्या घुमजाव करणारया अपप्रवृत्ती नेहमी त्या-त्या क्षेत्रात मोठे अडथळे ठरतात हे वास्तव आहे त्याला माध्यम क्षेत्र अपवाद नाही , या क्षेत्रात ही अश्या कित्येक माध्यमबाह्य केवळ पोटभरू , केवळ नावाची बिरुद लावून अतिरेकी धंदा मांडणाऱ्या प्रवृत्ती कमी नाही त्यात भरडला जातोय जो शिकला , अनुभवला , कार्यरत राहिला त्याने परखड लिहिले वास्तव मांडले निस्वार्थभाव जपला जो विकला गेला नाही जो लाचार झाला नाही तो पत्रकार मग तो टीव्ही माध्यमाचा असो की वृत्तपत्र माध्यमाचा , साप्ताहिकाचा की नव्याने विकसित होणाऱ्या मात्र अधिकृत मान्यता नसलेल्या सोशल मीडियावरील युट्युब , पोर्टल , मिडियावरचा पत्रकार ही मंडळी आपल्या माध्यमाची कामे करतात.
त्यासाठी राबतात , उरला मुद्दा त्या त्या माध्यमाचे मालक कोण? त्याचे संचालक , संपादक कोण? त्यासाठी अर्थसहायय देणारे कोण? मात्र जो ज्या ताकतिचा ज्या विश्वासाचा तो टिकतो तरतो , शेवटी वाचक , दर्शक , सातत्य यावर माध्यमाचे वर्तमान व भविष्य असते अन शेवटी आपली विश्वासार्हता ठरविते जनता जनार्धन…..
पत्रकार म्हणून आमची निवड करतांना पत्रकार कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित नसावा अशी अट असायची मात्र सध्या तर राजकीय पक्षांची मुखपत्र , नेत्यांच्या मालकीच्या दैनिकाची राष्ट्रीय , राज्य , लोकल चैनलची रेलचेल वाढलीय , राब राब राबून दमलेले कित्येक पत्रकार अश्या माध्यमात रोजगारासाठी सामील होतात तर बरीच मंडळी मोठ्या नामांकित माध्यमात विविध पदांवर असतात मात्र यात बिटवर केवळ तुटपुंज्या किंवा तेही नसलेल्या स्थितीत वार्ताहर म्हणून कार्यरत असलेल्या जबाबदारीने पिचलेल्या वार्ताहरांची स्थिती अत्यंत दयनीय आहे . ( त्यात काही जण सोडून ) बहुतांशी राबत असतात तर बातमीसाठी जीवापाड मेहनत घेतात त्यांची कौटुंबिक शारिरीक स्थिती अडचणीची असते हे ज्याला त्यांची आंतरिक जाणीव आहे त्यालाच माहीत मात्र निष्ठा असलेल्यांपेक्षा मिरवणारे ज्यास्त काट्यावर असतात. परखड मंडळी यात नेहमी सुळावर असते हेच वास्तव.
बदलता काळ व्यावसायिक पत्रकारितेचा असला तरी कोरोनाच्या स्थितीत मात्र सगळे भानावर येत आहे . मोठे मोठे माध्यमे त्यातील कित्येकांना कामे सोडण्यास भाग पाडले गेले , माध्यमांचा टीआरपी , वाचक वर्ग रोडवला तर अडचणीत जाहिराती थांबल्या अन मालकाने चामडी बचाव अभियान राबवून कित्येकांना वाऱ्यावर सोडल्याची कित्येक उदाहरणे सर्वत्र दिसतात काही माध्यमानी कमवा आम्हाला ही जगवा असा पायंडा स्वीकारला आहे तर हा बदल माध्यमाच्या प्रवासाला कुठं नेणार?
कोण जाणे? मात्र बदलती माध्यमे व त्यातील नको त्या लोकांचा घुमजाव प्रेस नावाचा गैरवापर , पत्रकारितेचा हरवत चाललेला विश्वास , यात भरडला जातोय अभ्यासू चिंतनशील , वास्तविकतेच भान असलेला पत्रकार….
(क्रमशः)

श्री रामभाऊ खुर्दळ ( नासिक )
पञकार संरक्षण समिती , महाराष्ट्र – महा. प्रदेश उपाध्यक्ष