
प्रशांत नाईक
अमरावती – जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे तहसील कार्यालयात आज आपल्या अपूर्ण मागण्या पूर्ण करणेबाबत तलाठी संघटनेचे लाक्षणिक उपोषण करण्यासाठी तहसील कार्यालया समोरच एक दिवसीय आंदोलन करण्यात आले आहे.
तालुका कोषागार अधिकारी यांच्या चुकीमुळे सर्व तलाठ्यांचे माहे जुलै चा पगार अद्याप आलेला नाही.
सादर बाबत तलाठी आस्थापना लिपिक यांच्या कडे चौकशी केली असता कोषागार अधिकारी हेतू परस्पर पगार बिलाला वारंवार वेगवेगळ्या आक्षेप लावून पगार थांबवत असल्याचे समजते.
30आगस्ट 2020पर्यंत मागील बिल थकबाकी सह न दिल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा तलाठी संघटनेने दिला आहे .
बाईट -श्री. कडू साहेब (तलाठी )










































