Home जळगाव देशपातळी वरील ट्रेड युनियनच्या संपास ऐनपूर महाविद्यालयातील एन्मुक्टोच्या प्राध्यापकांचा पाठींबा.

देशपातळी वरील ट्रेड युनियनच्या संपास ऐनपूर महाविद्यालयातील एन्मुक्टोच्या प्राध्यापकांचा पाठींबा.

171

शरीफ शेख

रावेर , दि. ०८ :- देशपातळी वरील ट्रेड युनियनच्या संपास ऐनपूर महाविद्यालयातील एन्मुक्टोचे प्रा.डॉ.पी.आर महाजन, प्रा.डॉ. के.जी.कोल्हे, सचिव प्रा.एम.के.सोनवणे, अध्यक्ष प्रा.डॉ. एस.ए.पाटील, प्रा.एच.एम.बाविस्कर, प्रा.एस.बी.महाजन, प्रा.एस.बी.पाटील, प्रा.संदिप साळूंके, प्रा.डॉ.पी.आर.गवळी, प्रा.व्ही.एच.पाटील यांच्या कळून पाठींबा देण्यात आला.

दि. ६- ८ डिसेंबर रोजी भुवनेश्वर येथे अखिल भारतीय प्राध्यापक महासंघ (AIFUCTO)ने व दि.5 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (MFUCTO) ने पारित केलेल्या ठरावानुसार देशातील ट्रेड युनियन अंतर्गत येणाऱ्या सर्व कामगार संघटनांनी दि. 8 जानेवारी 2020 रोजी देशपातळीवर केंद्र सरकारच्या सद्य धोरणाविरोधात संप पुकारलेला होता. या संपास एन्मुक्टोने आपला पाठिंबा दिला आहे. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले .केंद्र सरकारच्या धोरणामुळे दिवसेंदिवस सामान्य जनतेचे अवघड होत जाणारे जगणे, किमान वेतन कायद्याची न होणारी अंमलबजावणी , समान काम समान वेतन धोरण व जुनी पेंशन योजना लागू करण्याबाबत उदासिनता, अर्धवेळ / ठोक वेतन / तदर्थ भरती बाबतचे कामगारविरोधीधोरणांचा निषेध म्हणून , तसेच , सामाजिक सुरक्षितता निर्माण करावी यासाठी हा संप आहे , ट्रेड युनियनच्या संपात एन्मुक्टोने काळ्या फिती लावून सहभाग नोंदविला.