Home विदर्भ जन्मदात्या आईनेच आपल्या लाडक्या चिमुकलीस मारून टाकले

जन्मदात्या आईनेच आपल्या लाडक्या चिमुकलीस मारून टाकले

11
0

दुःखदायक घटना…

अमीन शाह

मंगळरूळपिर / वाशिम , दि. ०८ :- माता तू वैरणी ,, आई या शब्दाला फार महत्व आहे एक आई आपल्या लेकराला नऊ महिने पोटात ठेऊन त्याला दूध पाजून वेळ प्रसंगी उपाशी पोटी राहून आपल्या लेकरांच् पोट भरते व त्याला मोठा करते मात्र आज वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील गिम्भा येथे विपरीत घटना घडली आहे एका जन्मदात्या आईनेच आपल्या चार वर्षीय चिमुकलीस ठार मारले आहे या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार गिम्भा येथील रहिवासी अमोल किसन भगत 35 यांना तीन मुली असून ते शेतात काम करून आपली उप जीविका चालवितात काल वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक साठी मतदान होते अमोल हा मतदान करून परत येत असताना त्याला रस्त्यात त्याची बायको मुली सह भेटली असता त्याने कुठे चालली असे पत्नीस विचारून स्वयंपाक केला का नाही असे विचारून घरी चालण्या साठी बोलावले याच कारणावरून दोघात वाद ही झाला पती अमोल हा दोन मुलींना घेऊन घरी निघून आला पत्नी चार वर्षीय मुलगी तनिष्का सोबत मागे येत होती अचानक पत्नी ने आपली साडी फाडून आपल्या चिमुकल्या मुलीस एका झाडा ला लटकावून फाशी देऊन मारून टाकले पती अमोल याने अशी तक्रार मंगरुळपिर पोलिसात दिल्याने पोलिसांनी या निर्दयी माते विरुद्ध भा, द ,वि , 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे , घडलेल्या घटने मूळे परिसरात दुःख व आश्चर्य वयकत केले जात आहे .