Home विदर्भ अकोट तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

अकोट तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

61
0

कुशल भगत

अकोट , दि. ०८ :- अ.भा. मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्नीत अकोला जिल्हा पत्रकार संघ अंतर्गत अकोट तालुका पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकारदिनी आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीओम व्यास, तर प्रमुख अतिथी जिल्हा पत्रकार संघाचे सचीव विजय शिंदे,अकोट तालुका पत्रकार संघ सचिव मंगेश लोणकर, जेष्ठ पत्रकार दिपक देव, माजी अध्यक्ष रामदास काळे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकार यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकारितेचे बदलते स्वरुप व पत्रकारीता काल,आज आणि उद्या यावर मत व्यक्त केली तसेच आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक विजय शिंदे, संचालन अकोट तालुका पत्रकार संघ सचिव मंगेश लोणकर तर आभार किरण भडंग यांनी मानले. यावेळी हरीदास चेडे , बाप्पु नागळे , रमेश तेलगोटे, वसीम खान, ललित व्यास, अशोक मंगलाणी, विद्याधर कोठिकर,कमलकिशोर भगत, लकी इंगळे, संतोष विणके, स्वप्निल सरकटे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.