Home जळगाव संविधान बचाव नागरी कृती समिती च्या महा मोर्चा मध्ये हजारो लोकांची गर्दी...

संविधान बचाव नागरी कृती समिती च्या महा मोर्चा मध्ये हजारो लोकांची गर्दी उसळली.

99
0

सर्व धर्मीय रैली ने सर्वांचे लक्ष वेधले

शरीफ शेख

रावेर , दि. ०८ :- भारतीय नागरिकत्व कायदा, एन आर सी व एन पी आर याला त्वरित रद्द करा ह्या एकमेव मागणीसाठी संविधान बचाव नागरी कृती समिती जळगाव मार्फत जळगाव जिल्ह्यातील ५५ संघटनांनी महामोर्चा चे आयोजन केले होते या पंचावन्न संघटनेमध्ये मुस्लिम समाजासह हिंदू, आदिवासी, बौद्ध ,मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय या संघटनांचा सक्रिय सहभाग होता.
मुस्लिम महिलांची ची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. खानदेश मॉल सेंटर येथून निघालेल्या या मोर्चात हजारोच्या संख्येने महिला व पुरुषांचा समावेश होता मोर्चा च्या सुरुवातीला वाहनावर शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा लावलेल्या होत्या.

त्यानंतर आदिवासी बांधवांचे ढोल पथक होते या ढोल ताशा वर आपल्या संस्कृतीप्रमाणे आदिवासी बांधव नाच व गाणे म्हणत होते.
त्यानंतर २० मीटर लांबीचा एक बॅनर होता त्यावर सी ए ए, एन आर सी व एनटीआर त्वरित रद्द करा मागणीसाठी हा मोर्चा असून सदरचा फलक पाच मुस्लिम तरुणी, पाच आदिवासी महिला, पाच बौद्ध समाजाच्या महिला व पाच हिंदू समाजाच्या महिला अशा २० महिलांनी ते बॅनर हातात घेतले होते मोर्चा जेव्हा क्रीडासंकुलात समोर आला तेव्हा त्याचे शेवटचे टोक हे खानदेश मॉल येथे होते .
जाहिर सभा
अत्यंत शिस्तप्रिय अशा मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाहीर सभेत रूपांतर झाले जाहीर सभेत यांनी केले मार्गदर्शन मौलाना आझाद चे करीम सालार, राष्ट्रवादी प्रदेश चे अब्दुल गफ्फार मलिक, जमियात उलमा चे मुफ़्ती हारून संविधान, बचाव समिती भुसावळचे एडवोकेट एहतेशाम मलिक, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना च्या कल्पिता पाटील, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे ईश्वर मोरे, संविधान जागर समितीचे प्राध्यापक प्रीतीलाल पवार, नियाज अली फाऊंडेशनचे अयाज अली, जमात-ए-इस्लामी चे आमीर सोहेल, एस आय ओ महिला विंगच्या नीलोफर इक्बाल, अमोल कोल्हे ,शिवराम पाटिल, नगरसेवक इब्राहिम पटेल आवाज फाऊंडेशनचे जमील देशपांडे, रेडक्रॉस गनी मेमन,ईश्वर मोरे, रविन्द्र भैय्या पाटिल, खलील देशमुख, यांनी मार्गदर्शन केले.

सभेत एकूण सहा ठराव पारित करण्यात आले

नरेंद्र पाटिल फॉउंडेशन चे एडवोकेट विजय पाटील, मराठा सेवा चे सुरेंद्र पाटील, सिव्हील सोसायटीचे रागीब जहागीरदार, मुस्लिम मंच चे फारुक शेख, योगेश पाटील व राजेश पाटील यांनी ते सहा ठराव सभेसमोर मांडले असता त्याला हजारोच्या संख्येने मंजुरी देण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात लहान विद्यार्थिनी शरीया रउफ खान हिने देशभक्तीपर कवितेने सुरवात करण्यात आली .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद सपकाळे यांनी केले तर आभार फारुक शेख यांनी मानले.
शासनास दोन निवेदने देण्यात आली
माननीय पंतप्रधान व माननीय राष्ट्रपती यांना माननीय जिल्हा अधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे व पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांच्या हस्ते देण्यात आले .
पहिले निवेदन संविधान बचाव कृती समिती जळगाव यांच्यातर्फे रॅली च्या वतीने सी ए ए ,एन पी आर, एन आर सी घटनाविरोधी तरतुदी नियम तात्काळ रद्द करा, या देशाच्या सर्व धर्म समभाव या घटनात्मक आत्म्याचे संरक्षण करणेबाबत होते तर
दुसरे निवेदन जेएनयू विद्यापीठात गुंडांनी आणि उत्तर प्रदेश आसाम कर्नाटक राज्यांमध्ये पोलिसांमार्फत घडविल्या जाणाऱ्या शासन संमत हिंसाचारा बाबत होते.
सदरचे निवेदन मुकुंद सपकाळे व गफ्फार मलिक यांच्या हस्ते देण्यात आले तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाला फारुक शेख यांनी दोघी निवेदना बाबत थोडक्यात माहिती विशद केली या मागण्या आपण शासनाला कळवाव्यात व आमच्या भावनासुद्धा कडव्यात हजारो संख्येने मोर्चेकरी आले असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला नाही व जळगाव जिल्ह्यात सर्व धर्मीय समावेशक, सर्व जाती जमाती यांनी एकत्रित येऊन हा मोर्चा काढला हे जळगाव पॅटर्न सर्वदूर अमलात आणावे अशी मागणी सुद्धा केली.

*निवेदन यांच्या साक्षीने देण्यात आले*

सुरेंद्र पाटील, एडवोकेट विजय पाटील, मुकुंद सपकळे,विनोद देशमुख ,फारूक कादरी, ईश्वर मोरे, विकास मोरे, प्रीती लाल पवार ,सचिन धांडे, आमीर सोहेल, मुस्ताक शेख, आदींची उपस्थिती होती.
मोर्चा व जाहीर सभेत यशस्वीतेसाठी यांनी केलेले प्रयत्न…

अनिस शाह, इमरान फारिस,सानिर सय्यद ,कासिम उमर,अनवर खान,उबेद बेलदार,इक़बाल बेलदार, तय्यब शेख , जावेद खान,अज़ीज़ सिकलीगर, बशीर बुरहानी, सय्यद शाहिद,फारूक अहेलेकार, अन्वर शिकलकर, सलीम मनियार, सलीम पठाण, अब्दुल रब, शेख रेहान, मुस्लिम मंच व लोकसंघर्ष समितीचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

क्षणचित्रे
१ ) सभा सुरू होण्यापूर्वी सर्व 55 संघटनांचे प्रतिनिधी एकत्रित येऊन हातात हात घेऊन सर्व समुदायाला सामोरे गेले.

२) साडेदहा ते साडेचार वाजेपर्यंत चालू असलेल्या या मोर्चात व जाहीर सभेत सर्व पुरुष व महिलांनी शिस्तीचे प्रदर्शन घडविले.

३) मोर्चा व जाहीर सभेत मुस्लिम समाज, हिंदू समाज, आदिवासी व बौद्ध समाज खांद्याला खांदा लावून एकत्र बसल्यामुळे भारताच्या संविधानाचा कोणीही अपमान करणार नाही हे जळगावकरांनी सिद्ध करून दिले.

४) आताही जर भाजप सरकारने सदरचा काळा कायदा रद्द केला नाही तर आम्ही दिल्ली ला जाऊ व तेथे आंदोलन करू असा सुद्धा ठराव संमत करण्यात आला.

५) महाराष्ट्र शासन तसेच इतर राज्ये ज्यांनी एन आर सी ला विरोध केला त्यांचे अभिनंदनाचे ठराव पारित करण्यात आले.
६) कोणत्याही परिस्थितीत सी ए ए, एन आर सी, एन पी आर महाराष्ट्रात लागू होणार नाही याबाबत माननीय नामदार वर्षा गायकवाड यांनी संगीतल्याने त्यांचे सुद्धा अभिनंदनाचे ठराव करण्यात आले.

७) जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस दल जळगाव हे मुस्लिम मंच व इतर जे नागरिकत्व कायद्याला विरोध करीत आहे त्यांनासुद्धा चांगली वागणूक देत असल्याने प्रशासनाचे व पोलीस विभागाचे खास अभिनंदन करण्यात आले.

८) मोर्चा संपल्यानंतर खानदेश मॉल व रस्त्यावरील स्वच्छता इकरा समितीचे सदस्य व सोसायटीचे सहकारी यांनी पार पाडली.