Home महाराष्ट्र “काळाची गरज ओळखणारी संघटना म्हणजेच ‘आदिम’ ” –  राज्याध्यक्ष देवराव पदिले

“काळाची गरज ओळखणारी संघटना म्हणजेच ‘आदिम’ ” –  राज्याध्यक्ष देवराव पदिले

88
0

‘आदिम’चे १८ वे वार्षिक अधिवेशन उत्साहात

मुंबई सह राज्यातील विविध जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची हजेरी
आदिम च्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा केला सन्मान
मुंबई / यवतमाळ , दि. ०८ :- “कोणतीही सामाजिक संघटना हि फक्त एखाद्या विशिष्ट उद्देशापुरती मर्यादित राहून आपले कार्य करते. मात्र गोवारी जमातीपुढे येणाऱ्या प्रत्येक प्रश्न तसेच भविष्यातील काळाची गरज हेरून अविरत कार्य करणारी संघटना म्हणून ‘आदिम’ ने आपली ओळख निर्माण केली असल्याचे” प्रतिपादन ‘आदिम गोवारी समाज विकास मंडळ महाराष्ट्र’ चे राज्याध्यक्ष देवराव पदिले यांनी केले. नुकतेच दिनांक ५जानेवारी २०२० रोजी ‘आदिम’चे १८ वे वार्षिक अधिवेशन कल्याण (पश्चिम) येथे उत्साहात पार पडले.
अधिवेशनाच्या सुरुवातीला नागपूर येथे घडलेल्या गोवारी हत्याकांडामध्ये शहिद झालेल्या ११४ गोवारी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सर्वश्री विजय खंडरे, विलास नेवारे, सुरेश नेहारे, चंद्रशेखर मानकर, अशोक नेवारे, अशोक काळसर्पे, राजु भोयर, निखिल सायरे, दिनेश सरुळकर व सौ. माया पदिले विराजमान होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल सायरे यांनी केले. तर इतर मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. या अधिवेशन करीता मुंबई सह राज्यातील विविध जिल्ह्यातील आदिम गोवारी समाज विकास मंडळ महाराष्ट्र च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून हजेरी लावली.
केवळ समाजाच्या मागणीसाठी न लढता समाजातील वंचित, उपेक्षित घटकांकरीता ‘आदिम’ ने नेहमीच मदतीचा हात दिलेला आहे. अकोला जिल्ह्यात कोणत्याही रुग्णालयात दाखल होणाऱ्या समाजबांधवांना विनामुल्य भोजन, रक्त, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आदिम वैद्यकीय सेवा समितीचे विलास नेवारे, राजु भोयर व संपूर्ण चमु, रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरीता आदिम गोवारी महिला बचत गट स्थापन करून रोजगाराची संधी निर्माण करून दिल्याबद्दल महिला कार्यकर्त्यांची संपूर्ण चमु, तसेच तळागाळातील गोवारी बांधवांचे प्रश्न सातत्याने शासनकर्ते तथा शासकीय, प्रशासकीय अधिकारी यांचे पर्यंत लावून धरणारे सुरेश नेहारे, महेश वाघाडे, निखिल सायरे यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश वाघाडे तर आभारप्रदर्शन अशोकराव नेवारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यादोराव गजबे , एकनाथ राऊत , कृष्णाजी पदिले , अशोक काळसर्पे., चारुदत्त सरुळकर , दिनेश सरुळकर , मोतीबाबा भोंडवे , अशोक नागोसे , प्रशांत राऊत , प्रशांत नेवारे आदींसह अनेकांनी अथक परिश्रम घेतले.