Home महत्वाची बातमी तळेगाव दाभाडे येथील स्टील चोरी करणारी टोळीचा अवैध अड्डा उद्धवस्त.

तळेगाव दाभाडे येथील स्टील चोरी करणारी टोळीचा अवैध अड्डा उद्धवस्त.

406
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

मुंबई , दि. ०८ :- जुने मुंबई-पुणे महामार्गावरील शंकरवाडी येथील इंडियन ऑईल पेट्रोलियम पंप समोरील पैलवान हॉटेल व भोलेनाथ हॉटेल च्या मधील अंतर्गत कच्चा रस्त्यावरून काहीश्या पुढील अंतरावर मोकळ्या जागेत स्टील माफियांची टोळी कंटेनर ब्रेकिंग, स्टील रॉडस व स्टील पाईपांची चोरी जड वाहनातील डायव्हरांच्या संगनमताने रोज रात्री ते सकाळ पर्यंत करीत काही महिन्यांपासून करीत होते.

मराठी मासिक, मनपावृत्त मराठी साप्ताहिक, ग्रामस्थ मराठी पाक्षिक, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन कमिटी, नवसंजीवन फाउंडेशन ट्रस्ट, हिंद गौरव पत्रकार सेवा समिती च्या पदाधिकारीनी सदर घटनास्थळी गोपनीय पध्द्तीने रात्री ०७:३० वाजल्यापासून चार वाहनात वेगवेगळ्या ठिकाणी वाहने पार्किंग करीत माहिती घेत होते. दिनांक ०३/०१/२०२० आणि ०४/०१/२०२० रोजीच्या अर्थात शुक्रवार आणि शनिवार च्या उत्तर रात्री ०३:०० वाजता सदर चोरीच्या अवैध अड्ड्यावर होती. त्यानंतर काही वेळात एक टेम्पो एमएच १२ जि यू १२२१ मध्ये येथील अड्यावर आला त्यात असलेले बॉक्स फोडून स्टील प्लेट्स चोरण्यात आल्या होत्या.

एका प्लेट चे वजन १९.३० किलो आहे. माल लोडींग करण्यासाठी वजन काट्या जवळ पार्किंग करण्यात आला होता. त्यानंतर ठीक ०३:२२ वाजता एक ट्रेलर वाहन क्रमांक एमएच ४६ एच ५८६८ या गाडीतुन चोरांनी डायव्हरच्या संगमताने काही प्रमाणात स्टीलचा रॉडस चा माल काढून भरधाव निघून गेला होता. या सर्व घटनेची माहिती व खात्री उपरोक्त गठीत सदस्यांच्या टीमने घेतली होती. त्याच दरम्यान दोन १) ट्रेलर एमएच ४६ बी एफ ५८४३.२) एमएच ४६ बी एम ०९०१. या जडवाहनातून स्टील रॉडस चा माल काढण्यात आलेला असताना गठीत सदस्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष व स्थानिक तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे मधील कर्तव्यावर असलेल्या अंमलदार यांना मोबाईलवरून संपर्क साधून सदर अवैध अड्ड्याची माहिती देत पोलिसांची मदत मागितली.

अवैध अड्ड्यावरील ट्रेलर जडवाहने निघण्याच्या तयारीत असताना त्यांना संस्था ,पत्रकार ,संपादक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चारी वाहने मुख्य रस्त्याच्या प्रवेशद्वारा जवळ अडवून ठेवल्याने ट्रेलर मधील डायव्हर यांनी गाडी सोडून धूम ठोकली. तर येथील सक्रिय स्टील माफिया शमशउद्दीन खान , अक्रम खान , रेहमान शाह , शेरखान ठाकूर , लका , बुधदा , शमीम , लालचंद , जुनेद खान , इंदाज खान , शत्रूग्न सिंह आणि त्यांचे सहकारी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. स्थानिक पोलिसांचे वाहन मदतीला आले त्यांनी सदर घटनास्थळाची पाहणी करत असताना पोलीस आयुक्तांनी तक्रारींची गंभीर दखल घेत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्तव्यावर असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना घटनास्थळी योग्य कारवाईसाठी पाठविले होते.त्यानंतर काही तासांनी म्हणजे सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान स्थनिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी धाव घेत अवैध धंद्याची माहिती घेत संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे अवैध धंद्याचा अड्डा उघडकीस आणणाऱ्या तक्रारदारांस आश्वासन दिले.अधिक पोलीस तपास एपीआय आर्टिगे करीत आहेत.