Home महाराष्ट्र पाच वर्षा नंतर त्याच घरात चोरी करायला गेला अन अडकला पोलिसांच्या जाळ्यात...

पाच वर्षा नंतर त्याच घरात चोरी करायला गेला अन अडकला पोलिसांच्या जाळ्यात ,

344

पाच वर्षा नंतर त्याच घरात चोरी करायला गेला अन अडकला पोलिसांच्या जाळ्यात ,

65 लाख रुपये चा मुद्देमाल जपत

अमीन शाह

पाच वर्ष्यापूर्वी घरफोडून 50 लाख अन दागिने नेल्यानंतर पुन्हा आता तेच घर फोडण्यासाठी चोरटा आला खरा; पण त्याचा गेम फसला अन तो पोलिसांच्या हाती लागला. त्याला पोलिसांनी पकडले व चोरीचा गुन्हा दाखल केला. चौकशीत मात्र या पाच वर्ष्यापूर्वी झालेली घरफोडी देखील त्यानेच केल्याचे समोर आले. शोध घेऊन न सापडणारा दुसऱ्या प्रयत्नात सापडला. या पैश्यामधून त्यांनी फ्लॅट अन गाड्या घेऊन सुखी जीवन जगत असल्याचे दिसून आले आहे. मात्र पोलिसांनी आता घरे गाड्या सर्व जप्त केले आहेत. डेक्कन पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.
सोमनाथ बंडू बनसोडे (वय 47, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेष्ठ महिला मोडक या प्रभात रस्त्यावरील ग्रीन सोसायटी येथे राहतात. दरम्यान अचानक पहाटे पाईपने पहिल्या मजल्यावर चढून चोरट्यांने चाकूने हल्ला करत चोरीचा प्रयत्न केला असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच चोरट्यांस जागीच पकडले. एका सतर्क नागरिकांमुळे तो पकडला गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी याच घरात पाच वर्षापूर्वी म्हणजेच 2015 साली घरफोडी झाली होती. ती घरफोडी मी आणि माझा साथीदार सुधाकर बनसोडे याने केली असल्याचे सांगितले. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांनी या माहितीची खात्री केली आणि सुधाकर बनसोडे याला पकडले. दोघांकडे चौकशी केल्यानंतर या घरफोडीत त्यांनी रोख 50 लाख व दागिने असा जवळपास 70 लाखाहून अधिक माल चोरला होता. याबाबत गुन्हा दाखल होता. मात्र त्यात 4 लाख रुपयांची चोरी झाल्याची नोंद होती. त्यामुळे परत फिर्यादी मोडक यांना विचारले असता त्यांनी सांगितले इतकी चोरी झाले हे पतीला समजले असते तर त्यांना धक्का बसला असता. त्यामुळे आपण 4 लाखाची फिर्याद दिली असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोघांकडे या पैश्यातून काय केले याची माहिती घेतली. त्यावेळी एकाने मांजरी बुद्रुक येथे 1 गुंठा जागेत बांधलेले घर आणि दुसऱ्याने 2व लाखाचा भुगाव येथे फ्लॅट घेतला असल्याचे सांगितले. तर त्यांनी एक कार आणि दुचाकीही घेतली होती. पोलिसांनी वाहने आणि जगाचे कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच सोने तारण ठेवून त्यांनी कर्ज देखील घेतले होते. असा एकूण 62 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त डॉ सुधाकर यादव, वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, सहायक निरीक्षक सविता चव्हाण, कर्मचारी हरिचन्द्र केंजळे, संजय शिंदे, धोंडोपंत पांचाळ, विजय चिरमे, सचिन चव्हाण, बाळासाहेब भांगले, प्रवीण कांचन यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे