Home जळगाव चोपडा येथिल वैद्यकीय शिबिरात ६५० रुग्णाची तपासणी

चोपडा येथिल वैद्यकीय शिबिरात ६५० रुग्णाची तपासणी

130

जळगांव कोविड केअर युनिट, इकरा यूनानी कॉलेज व चोपडा येथील डॉक्टरांचा सहभाग

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे सुरमाझ एज्युकेशन हेल्थ अंड सोशल वेल्फेअर यांनी जळगाव केअर युनिट व ईकरा युनानी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व वैद्यकीय शिबिराचे आयोजन सानेगुरुजी वसाहत चोपडा याठिकाणी केले होते.

यात मिल्लत नगर, शेखपुरा, मुस्तफा कॉलनी व केजीएन कॉलनीच्या ६५० नागरिकांनी यात सहभाग नोंदवून आपली आरोग्य तपासणी करून घेतली या नागरिकांना मोफत औषधी व गोळ्या सुद्धा देण्यात आल्या.

उद्घाटन सोहळा
या वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन दारुल कजाचे मुफ्ती अतिकुर रहमान यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यावेळी ईकरा एज्युकेशन सोसायटीचे करीम सालार, जळगाव कोविड केअर युनिटचे फारुक शेख, सुरमाझ सोसायटीचे हाजी उस्मान ,डॉक्टर रागिब व अबूलयझ शेख आदी उपस्थित होते.
उद्घाटन पर मार्गदर्शन करताना मुफ्ती अतिक यांनी समाजाला खरी गरज आज वैद्यकीय शिबिरांची असून त्यायोगे लोकांच्या मनातील भीती दूर करणे हा मुख्य उद्देश असून कोरोणाला आपण हरवू शकतो ही जिद्द प्रत्येकाने आपल्या मनात ठेवावी असे सांगितले.
फारुक शेख व करीम सालार यांची समयोचित भाषणे झाली.

डॉक्टरांचा होता सहभाग

डॉक्टर जावेद शेख, डॉक्टर रियाज बागवान ,,डॉक्टर वसी अहमद, डॉक्टर शाहरुख खान, (सर्व कोविड केअर युनिट जळगाव )डॉक्टर शोएब शेख, डॉक्टर इक्बाल शेख, डॉक्टर मुजीब पिंजारी (सर्व इकरा यूनानी कॉलेज जळगाव) डॉक्टर फारुक शेख, डॉक्टर वसीम खाटीक, डॉक्टर नदीम सय्यद, डॉक्टर शोएब सय्यद, डॉक्टर रफिक सय्यद ,डॉक्टर सादिक शेख, डॉक्टर रागिब शेख ,डॉक्टर अय्युब पिंजारी, डॉक्टर अंजर सिद्दिकी, डॉक्टर मुदस्सर शेख (सर्व अडावद व चोपडा)

प्रमुख अतिथी म्हणून जळगावचे अझीझ सालार अल फैझ फाउंडेशन, अल्ताफ शेख अल हिंद,अनिस शाह कोविड केअर युनिट, आबिद हारून व अजीम शेख मन्यार बिरादरी जळगाव, चोपड्याचे हाजी उस्मान,अबू लयास शेख,महेमुद बागवान,झियाउद्दीन काझी,सउद बागवान,एस बी नाना यांची उपस्थिती होती.