Home जळगाव शब ए कद्र ची नमाज घरी अदा करा पोलिसांचे आवाहन

शब ए कद्र ची नमाज घरी अदा करा पोलिसांचे आवाहन

67
0

जलगांव:एजाज़ शाह

२० मे रोजी २६ वा रोजा हा रमजान चा महत्त्वपूर्ण असा दिवस असून या दिवशी पवित्र पवित्र कुराणाचे अवतरण झाल्याचे सिद्ध झालेले आहे.
म्हणून या दीवसाच्य रात्री ला शब ए कद्र साजरी केली जाते.

या रात्रीसुद्धा मुस्लिम समाज रात्रभर अल्लाची प्रार्थना करतो व अल्लाह ला साकडे घालतो व निश्चितच अल्लाह त्याची प्रार्थना कबूल करतो म्हणून मुस्लिम समाजाने आपापल्या घरी प्रार्थना करावी व हा कोरोना आजार सम्पूर्ण विश्वतून नष्ट करावा यासाठी अल्लाकडे साकडे घालावे असे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक विनायक लोकरे यांनी यांनी केले आहे.
बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह च्या विश्वस्तांना बोलवून त्यांच्याशी लोकरे बोलत होते. ट्रस्टतर्फे फारुक शेख,सह सचिव अनीस शाह व जामा मस्जिद ट्रस्ट चे तय्यब शेख उपस्थित होते
फारूक शेख यांनी पोलिसांना आश्वासित केले मुस्लिम समाज जऱ २३ मार्च ची शब ए मैराज व ८ एप्रिल ची शब बारात आपल्या घरी राहून प्रार्थना करू शकतो तर आता ही शेवटची शब ए कद्र सुद्धा तो घरूनच प्रार्थना करेल.

*सय्युक्त आव्हान*

शब ए कदर ला कोणत्याही मुस्लिम बांधवांनी मुस्लिम कब्रस्तान मध्ये तसेच ईदगाह मशीद व इतर मशीदी मध्ये येऊ नये असे आवाहन ईदगाह ट्रस्ट व पोलिसांतर्फे करण्यात आलेले आहे .

Unlimited Reseller Hosting