Home जळगाव होम क्वांरटाईन केलेल्या व्यक्ती बाहेर फिरताना दिसल्यास दाखल होणार गुन्हे…

होम क्वांरटाईन केलेल्या व्यक्ती बाहेर फिरताना दिसल्यास दाखल होणार गुन्हे…

325

लियाकत शाह

जळगाव – जिल्ह्यात जे नागरीक बाहेर गावावरून आलेले आहेत व ज्यांच्या १४ दिवसांचा होमक्वारंटाईनचा कालावधी संपलेला नाही, असे नागरीक बेकायदेशीर बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तथा इंन्सिडंन्ट कमांडर गोरक्ष गाडीलकर, यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, रुग्णांची संख्या नियंत्रीत करण्यासाठी व साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वस्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून या कालावधीत जे बाहेर गावावरून नागरीक आपल्या जिल्ह्यात आलेले आहे त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु असे निदर्शनात आले की, काही नागरीक त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला असताना सुद्धा घरी न राहता इतरत्र फिरत आहे हे अतिशय गंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाची परीस्थिती लक्षात घेता जे नागरीक बाहेर गावावरून आलेले आहेत व ज्यांच्या चौदा दिवसांचा होमक्वारंटाईनचा कालावधी संपलेला नाही. अशा नागरीकांची अचानक तपासणी करावी. जे नागरीक बेकायदेशीर बाहेर फिरताना दिसतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन, त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही गाडीलकर यांनी दिले आहेत.