Home विदर्भ खर्रा साठी लागणारी ८ लाख रुपयांची तुकडा सुपारी पकडली

खर्रा साठी लागणारी ८ लाख रुपयांची तुकडा सुपारी पकडली

143

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

रवि माळवी

यवतमाळ – नागपुर येथुन किराणा मालामधुन छुप्या पध्दतीने अन्नधान्याचे गोणी मध्ये खर्रा करीता लागणारी तुकडा सुपारी ही एका ट्रकमधून छोटी गुजरी, यवतमाळ येथील न्यु हिंदुस्थान गुड्स गॅरेजचे गोडावून मध्ये आली असता पहाटे ६ वाजताच्या सुमारास पोलीसांनी धाड टाकून ती पकडली.
देवानंद शंकर राऊत रा.जांब रोड, अकोलकर लेआऊट यवतमाळ, कुणाल नामदेव बुटले रा. वाघापुर यवतमाळ असे पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दिनांक ६ मे रोजी पोलीस अधिक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती माधुरी बावीस्कर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शखा प्रमुख पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे नेतृत्वाखाली यवतमाळ शहरात पहाटेच्या सुमारास खर्रा, तंबाखु व अवैधपने दारु विक्री करणारे ईसम यांचे शोध घेवून कार्यवाही करणे कामी स्थानिक गुन्हे शखेचे पथकांना विशेष भाग कार्यवाही करीता नेमुण देवून कोरोना/कोविड-१९ आजाराचे प्रसारास प्रतिबंध व्हावा व जनतेचे आरोग्य सुरक्षीत रहावे या हेतुने कार्यवाहीचे आदेश दिलेले होते.
नागपूर येथून एका ट्रक मधून किराणा मालामध्ये छुप्या पध्दतीने अन्नधान्याचे गोणीत खर्रा करीता लागणाीर तुकडा सुपारी ही छोटी गुजरी, यवतमाळ येथील न्यु हिंदुस्थान गुड्स गॅरेज चे गोडावुन मध्ये आली असता पोलीसांनी पहाटे ६ वाजाचे दरम्यान धाड टाकून ८०० किलो सुपारी किंमत ८ लाख रुपये व सदरच मुद्देमाल असलेला ट्रक एम.एच.४० वाय ७७०७ किंमत २२ लाख रुपये असा एकुण ३० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला व आरोपींविरुध्द यवतमाळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख, पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर, टोळी विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलन कोयल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, सहाय्यक फौजदार ऋषी ठाकुर, पोलीस हवालदार योगेश गटलेवार, देवतळे, राठोड, राऊत यांनी केली.