Home रायगड मा.आ.माणिकराव जगताप यांचा प्रयत्नांतून महाड ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर सुविधा

मा.आ.माणिकराव जगताप यांचा प्रयत्नांतून महाड ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर सुविधा

135
0

महाड , ( प्रतिनिधि ) – दक्षिण रायगडमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासुन कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे नागरीक आणि प्रशासनामध्ये संभ्रमाच वातावरण आहे.

याच पार्श्वभुमीवर लोक विकास सामाजिक संस्था आणि लक्ष्मी केमीकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने महाडमध्ये पोलिस कर्मचारी, नगर पलिका कर्मचारी यांना फेसशिल्ड तर महाडच्या ट्रॉम केअर युनिटला तीन व्हेंटीलेटर, इन्फ्रारेड थमॉमिटर आणि शंभर PPE किटचे वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप, नगराध्यक्षा स्नेहल जगताप, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, ट्रॉम केअर युनिटचे अधिक्षक डॉ. भास्कर जगताप, उपनगराध्यक्ष संदीप जाधव, महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी जिवन पाटील आदी उपस्थित होते.