Home मराठवाडा रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले

रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले

403

जालना येथील एस आर जे कंपनीत होते कामाला ; मध्यप्रदेश येथील होते मजूर

सय्यद नजाकत

जालना – औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात ( करमाड डीएमआयसी परिसर) रेल्वे रुळावर थकून झोपलेले १४ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेले. हा भीषण अपघात पहाटे ५.१५ वाजता घडली. यात २ मजूर गंभीर जखमी असून तिघे जीव वाचविण्यात यशस्वी झाले आहेत. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून ते जालना येथे लॉकडाऊन मध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील एसआरजे कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथे अडकले होते . दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत अशी माहिती या मजूरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली . काही कळायच्या आत १४ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत.
जालना येथील स्टील कंपनीचे १९ कामगार भुसावळला जाण्यासाठी रेल्वेरुळावरून पायी निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असतांना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १४ जण ठार तर २ कामगार जखमी झाले. सर्वांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे.