Home विदर्भ एकाच दिवशी तब्बल 525 वाहनांवर दंडात्मक कारवाईत 150 वाहने जप्त , शहर...

एकाच दिवशी तब्बल 525 वाहनांवर दंडात्मक कारवाईत 150 वाहने जप्त , शहर वाहतूक विभागाची धडक कार्यवाही

56
0

जफर खान

अकोला – जिल्हा अजूनही रेड झोन मध्ये आलेला नाही परंतु धोका कायम आहे, अकोला शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून पोलीस प्रशासन दिवस रात्र कार्यरत आहे.

अकोला जिल्हा रेड झोन मध्ये येऊ नये व त्या अनुषंगाने कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासन वेळो वेळी आवाहन करीत आहे, परंतु सदर आवाहन अकोलेकर गांभीर्याने घेण्यास तयार नाही, रस्त्यावरील अनावश्यक गर्दी कमी व्हावी व वाहने विनाकारण रस्त्यावर येऊ नये म्हणून मंगळवारी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर व शहर उपअधीक्षक सचिन कदम ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके ह्यांनी त्यांचे कर्मचाऱ्या सह धडक कार्यवाही सुरू केली असून एकाच दिवशी 525 वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करून 150 वाहने वाहतूक कार्यलयात जप्त करून ठेवण्यात आली जप्त वाहने लोकडॉउ न संपे पर्यंत सोडण्यात येणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिला असून नागरिकांनी विनाकारण आपली वाहने रस्त्यावर आणू नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.