Home पश्चिम महाराष्ट्र कोरोना संकटात सापडलेल्या गरिबांना शंभुसेना, माजी सैनिक आघाडीच्या वतीने किराणा किटचे वाटप..

कोरोना संकटात सापडलेल्या गरिबांना शंभुसेना, माजी सैनिक आघाडीच्या वतीने किराणा किटचे वाटप..

66
0

पुणे , (प्रतिनिधि) – लॉकडाऊनच्या प्रादुर्भावामुळे सध्या गरीब, कष्टकरी, असंघटित मजूर, कामगारांच्या हाताला काम उपलब्ध नसल्याने त्यांना आर्थिक संकटाला सोमोरे जावे लागत असल्याने अशा संकट समयी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत शंभुसेना, माजी सैनिक आघाडीने साधारणतः 15 दिवस पुरेल एवढ्या किराणा मालाचे किट देऊन गरजूंना दिलासा दिला.

जगभरात कोरोना रोगाची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेकांना बेरोजगारीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अशा अडचणीच्या प्रसंगी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शंभुसेना प्रमुख दिपक राजेशिर्के, व माजी सैनिक आघाडीचे अध्यक्ष सुनील काळे यांना सदर माहिती देताच संघटनांनी तात्काळ निर्णय घेऊन 15 दिवस पुरेल एवढया किराणा मालाच्या किटचे गरजूंना वाटप करण्यात आले.

यात प्रामुख्याने गव्हाचे पीठ, भाताचे तांदूळ, साखर, खाण्याचे तेल, चहा पत्ती, मिठ पुडा, चना डाळ, मिर्ची पावडर, हळद पावडर, जिरी, मोहरी, मुंग डाळ, तूर डाळ, कपड्यांचा साबण, आंघोळीचा साबण आदी. वस्तूंचा समावेश आहे.

या सामाजिक कार्यास श्री. भरत मोरे, सुरेश शिंदे चिपळूण, संजय नाळे, एस. टी. मुरगन, राम कोरके, लक्ष्मीकांत राजेशिर्के, रमेश गायके, विजय राजे, शेषराव पाटील, रामचंद्र पानसरे, शेखर डोंबे, विद्याधर उपाधे, राकेश मिश्रा, भिमराव खैरे, पद्माकर फड, ज्योत्स्ना गर्गे, अजितराव निंबाळकर, रत्नाकर राजेशिर्के, प्रकाश म्हस्के, सुनील रायकर, नवनाथ चव्हाण, किरण रासकर यांनी विशेष सहकार्य केले.

याकामी प्रशासकीय अधिकारी तलाठी कोकाटे मॅडम व ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले व स्थानिक नियोजन विष्णू धांडे, निखिल पाटील आदींनी केले. या उल्लेखनीय सामाजिक उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. अशा प्रकारचे उपक्रम गाव, शहर, तालुका, जिल्हा पातळीवर करण्याचे आवाहन शंभुसेना प्रमुख दिपक राजेशिर्के व माजी सैनिक आघाडीचे सुनील काळे यांनी केले.