Home विदर्भ कोरपनात चाळीस वाहनावर दंडात्मक कारवाई

कोरपनात चाळीस वाहनावर दंडात्मक कारवाई

161

पोलिसांची धडक मोहीम ; विनाकारण रस्त्यावर फिरणे पडले महागात

कोरपना – मनोज गोरे

चंद्रपुर – कोरोना मुळे देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरी मात्र विनाकारण रस्त्यावर वाहने चालवणाऱ्या 40 व्यक्तीवर दंडात्मक कारवाई सोमवारी कोरपना पोलिसांनी केली.
कोरोना हा संसर्गजन्य विषाणू आहे.त्यामुळे एकमेका पासून सुरक्षित अंतर ठेवणे. घरातून बाहेर न पडणेच योग्य आहे.तरी मात्र अनेक महाभाग विनाकारण रस्त्यावर वाहने फिरवतात. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. या अनुषंगाने संचारबंदी व मोटार वाहन कायदा अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाई कोरपना चे पोलीस निरीक्षक अरुण गुरुनुले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र वासनिक, वाहतूक पोलीस विनोद पडवाल, रमेश वाकडे, भगवान पडवाल, भेंडेकर, हेमंत धवणे, संजय शुकला, राजू चिताडे, अविनाश, साईनाथ जायभाये, मोहूर्ले आदींनी केली. या कारवाईमुळे विनाकारण वाहने फिरणार्याचे धाबे चांगलेच दणाणले आहे.