Home महत्वाची बातमी बदनापूर येथे तोंडाला मास्क न वापरणाऱ्या दहा जणांवर दंडात्मक कार्यवाही

बदनापूर येथे तोंडाला मास्क न वापरणाऱ्या दहा जणांवर दंडात्मक कार्यवाही

115

दुसऱ्यांदा विना मास आढळून आल्यास होणार गुन्हा दाखल ,

सय्यद नजाकत ,

बदनापूर/प्रतिनिधी

औरंगाबाद शहर रेड झोन मध्ये असल्याने आणि बदनापूर शहर सीमेवर असल्यामुळे कोरोना रोग बदनापूर शहरात पोहचू नये म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व जिल्हा पोलिस अधीक्षक एस चैतन्य जातीने लक्ष ठेऊन आहेत मात्र नागरिक या रोगाला गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून येत असून सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असतांना मास्क न वापरणाऱ्या दहा जणांविरुद्ध नगर पंचायत ने दंडात्मक कारवाई केली आहे तर आता केवळ दंडात्मक कारवाई न करता थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन,प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे,औरंगाबाद व जालना हे दोन जिल्हे लगत असून या दोन्ही जिल्ह्याची सीमा मात्र बदनापूर आहे त्यामुळे बदनापूर शहरातील व तालुक्यातील अनेक जणांचा संपर्क औरंगाबाद तर औरंगाबाद जिल्ह्यतील शेकटा, करमाड या गावातील अनेकांचा संपर्क जालना जिल्ह्यत आहे,अश्या परिस्थितीत कोरोना संकट जालना जिल्ह्यत दाखल होऊ नये म्हणून जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे व जिल्हा पोलिस अधीक्षक एस चैतन्य जातीने लक्ष देत असून दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वरुडी चेक पोस्ट वर कडक सूचना देण्यात आलेल्या असून पोलीस निरीक्षक एम बी खेडकर हे नियमित आढावा घेऊन पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांना पाठवीत आहे

लगतचा जिल्हा रेड झोन मध्ये असल्याने जालना जिल्ह्यतील शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क न वापरल्यास त्यांच्यावर १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तसेच दंडात्मक कारवाई केली जात आहे मात्र बदनापूर शहरातील नागरिक गंभीरतेने न घेता मास्क चा वापर न करता बाहेर निघत असल्याने बदनापूर नगर पंचायत ने दहा जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केल्याने मास्क न वापरणाऱ्या मंडळी मध्ये दहशत निर्माण झाली आहे ,नगर पंचायत अभियंता गणेश ठुबे,अशोक बोकन,रशीद मौलाना यांचा पथक सतत शहरात अश्याया मंडळींचा शोध घेत आहे
शहरातील कोणत्याही भागात तुम्ही रहात असाल तरी मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे पोलिसांनी वारंवार आवाहन केले तरीही अनेक जण विनाकारण मास्क न घातला घराबाहेर पडत आहे. अशांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता थेट गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक एम बी खेडकर यांनी सांगितले