Home मराठवाडा कंधार येथील न्यायधिश व अभिवक्ता संघाच्या वतीने गरजू गोरगरिबांना केले अन्न धान्याच्या...

कंधार येथील न्यायधिश व अभिवक्ता संघाच्या वतीने गरजू गोरगरिबांना केले अन्न धान्याच्या किटाचे वाटप

33
0

नांदेड, दि.२७ ( राजेश भांगे ) – कंधार , येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, दिवानी न्यायालय वरिष्ठ् स्तर आणि दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर या सर्व न्यायधिश आणि कंधार तालुका अभिवक्ता संघच्या वतीने गरजु व गोरगरीबांना धान्याच्या किटाचे वाटप जिल्हा न्यायधिश अतुल सलगर, न्यायधिश निसळ दिवानी न्यायधिश वरिष्ठस्तर, न्ययााधिश सय्यद ल.मु ,दिवानी कनिष्ठ स्तर, न्यायधिश बी.डी तारे व अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड दिलीप कुरूडे यांच्या हास्ते करण्यात आले.
देशात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असुन या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी भारत सरकारने संपुर्ण देश लाॅकडाउन केला आहे त्यामुळे या लाॅकडाउन मध्ये गोरगरिब जनतेची उपासमार होउ नये म्हणुन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील सर्व न्यायधिशाच्या वतीने आणि कंधार तालुका अभिवक्ता संघाच्या वतीने गरजू व गोरगरिब जनतेला मदत व्हावी म्हणुन धान्याच्या किटाचे वाटप करन्यात आले. यावेळी जिल्हा न्यायधिश अतुल सलगर, न्यायधिश निसळ दिवानी न्यायधिश वरिष्ठस्तर, न्यायाधिश सय्यद ल.मु दिवानी न्याधिश कनिष्ठ स्तर, न्यायधिश बी.डी तारे सहदिवानी न्यायधिश कनिष्ठ स्तर व कंधार तालुका अभिवक्ता संघ कंधार चे अध्यक्ष अॅड. दिलीप पंढरीनाथराव कुरुडे सहसचिव अॅड . पांडुरंग कदम, सचिव अॅड . डि .पी. गायकवाड, अॅड . जि एस डांगे, अॅड . बि के पांचाळ, अॅड . श्याम पांगरे कर, अॅड़ एस एस लाठकर, अॅड . प्रफुल शेंडगे अॅड राठोडकर सरकारी वकील अॅड महेश कागणे ‘ अॅड निरज कोळनुरकर अॅड अभय देशपांडे अॅड अनिल डांगे अॅड रवि केंद्रे अॅड . सागर डोग्रजकर अँड गंगाप्रसाद यन्नावार अॅड . सत्यनारायण मानसपुरे अॅड .स्नेहा देशपांडे अॅड वर्षाराणी जोंधळे अॅड सिध्दार्थ वाघमारे अॅड तथागत वाघमारे अॅड सुहास मस्के अॅड राजेश जोशी अॅड हणमंत कुट्टे ईत्यादी वकील तसेच पोलीस कर्मचारी कोर्ट ड्युटी पोलीस क्षीरसागर ,लगडे , केंद्रे , देशमुख ‘ व इतर पोलीस कर्मचारी व महीला कॉन्स्टेबल गुट्टे आदी उपस्थित होते. तरी यावेळी धान्याच्या किटांचे वाटप करताना सोशल डिस्टसिंगचे योग्य अंतर ठेवून व सर्वाच्या तोंडाला मास्क लावुन धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

Unlimited Reseller Hosting