Home मराठवाडा डाक विभागा पुढे….कोरोना हरला…..पोस्टमन जिकला..

डाक विभागा पुढे….कोरोना हरला…..पोस्टमन जिकला..

118

नांदेड / किनवट , दि.२१ :- किनवट तालुक्यातील गोंडेमहागाव बीओ मध्ये मोबाईल रेंज येत नसल्याने पोस्टमन नी पेट्रोल पंपाच्या भीतीवर उभे टाकून मोबाईल रेंज घेऊन केले निराधार महिलेला पैसे वाटप.
■ इंग्रजाच्या काळापासून चालत आलेली टपाल सेवा आज एका मोठ्या वेगळ्याच उंचीवर पोहोचली आहे.


बातमीपत्र:सुरेश सिंगेवार. मार्केटिंग एक्सएटिव्ह डाक विभाग मुख्य पोस्ट ऑफिस नांदेड.

आजच्या मोबाईल , फेसबुक , व्हाट्सअप्प , ट्विटर, इ मेल,डिजिटल च्या जमान्यात टपाल यंत्रणा आणि मोबाईल पोस्टमन काका आज ही लोकांच्या मनात विश्वास नातं कायम ठेवला आहे.
टपाल खात्याची नियमितता,अचूकता कार्येप्रणाली ही बिनचूक व विश्वासार्ह आहे.
यात जनतेच्या मनात तीळमात्र इतकी शंका नाही.
पोस्ट ऑफिस म्हंटल की डोळ्यासमोर उभा राहातो तो पोस्टमन कोरोना सारख्या माहामारी हो,ऊन,पाऊस तमा न बाळगता आपल्याला आपल्या प्रियजणांनी पाठवलेली पत्रे,मनीओड्रंर,स्पीडपोस्ट प्रत्येकाच्या घरापर्येंत तो प्रामाणिकपणे पोहोचतो तो पोस्टमन काका.
तशीच एक घटना नांदेड जिल्ह्यातील आदिवासी भागातील किनवट तालुक्यातील गोंडेमहागाव या गावातील आहे.
संपुर्ण भारतात कोरोनाच्या महामारीत देश संकटात आहे.कोरोना ला हरविण्यासाठी लॉकडाउन चालू आहे.
याचं काळात देशातील नागरिक उपवासपोटी राहू नये.
दोन वेळचे पोटभरून जेवण मिळावे यासाठी सरकार ने जेवण्याची व्यवस्था, रहाण्याची व्यवस्था, राशन दुकान मधून धान्य देण्याची व्यवस्था केली आहे.
यायचा एक भाग म्हणून गोरगरिबांच्या जनधन,निराधार,विधवा पेन्शन,अपंगांचे पेन्शन बँकेच्या खात्यात जमा केले आहे.
हा पैसे ग्रामीण भागात व शहरी भागातील जनतेला घरपोच पैसे मिळण्याची व्यवस्था भारतीय डाक विभागाने पोस्टमन मार्फत केली आहे.
कोरोनाच्या संकटकाळी गोंडेमहागाव येथील सामान्य नागरिकाना,मधुमेह, शुगर, गावातील गरोदर महिलां,निराधार,अपंगांना दवाखान्यात उपचारासाठी पैशा वाचून उपचार रुखु नये म्हणून गावात मोबाईल रेंज येत नाही. म्हणून त्यांनी पोस्ट ऑफिसचे काम बंद ठेवले नाही.
कोरोनाला हरविण्यासाठी गावापासून पाच,सहा किलोमीटरवर एक पेट्रोल पंप आहे.त्या ठिकाणी मोबाईल रेंज येते हे पोस्टमन ला माहिती होती.
पोस्टमन श्रीकांत चव्हाण यांनी गावातील निराधार लाभार्थीत्यांना सोबत पायी घेऊन गेले.
पोस्टमन यांनी पेट्रोल पंपच्या भीतीवर एका हातात मोबाईल व दुसऱ्या हातात मोबाईल स्कॅनर उभा राहून मोबाईल रेंज घेतला.
मोबाईल वर निराधार लाभार्थीच्या आधार क्रमांक जोडला निराधार महिला पुष्पां जाधव याचे हात हँड वॉश धुऊन घेण्यात सांगितले व मोबाईल स्कॅनर व आपल्या हाताचा आंगठा ठेवला निराधार महिलांच्या मागणी केल्या प्रमाणे पोस्टाच्या मायक्रो ATM मधून रुपये तीन हजार रोख काडून दिले.
___________________________________
■ याबद्दल पोस्टमन याचे गावात कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
■ डाक विभागा पुढे..कोरोना हरला….पोस्टमन युक्तीने जिकला…..
________________________________
■ आज कामाचा बोज जास्त असला तरी आपण एक राष्ट्र सेवा करीत आहे. त्यांची ही जाणीव त्यावेळी होती आज ही आहे..
________________________________