Home विदर्भ लॉकडाऊनच्या काळात  बनावट पास तयार करुन देणार्याला अटक

लॉकडाऊनच्या काळात  बनावट पास तयार करुन देणार्याला अटक

109

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

रवि माळवी

यवतमाळ – बनावट अत्यावश्यक सेवा पास तयार करुन नागरीकांना देवून प्रशासनाची फसवणूक केल्याची प्रकरणी महागाव येथील अजिंक्य कॅप्युटर्सचा चालक अजिंक्य गंगमवार याला पोलीसांनी आज दिनांक २० एप्रिल रोजी अटक केली.
कोविड-१९ चे संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु असून शासनाने संपुर्ण महाराष्ट्र राज्यात कलम १४४ जाफौ प्रमाणे संचारबंदी लागु केली आहे. कोविड-१९ चे संसर्गाचा प्रतिबंध करण्याकरीता शासनस्तरावर विविध उपाययोजनाचा अवलंब करण्यात येत आहेत. याच उपय योजने अंतर्गत जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी आदेश निर्गमित करुन प्रसिध्द केले आहेत.
सदर आदेशाचे उल्लंघन करणा:या ईसमाविरुध्द कायदेशीर कार्यवाही करणे करीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके व त्यांचे पथक शासकीय वाहनासह महागांव परिसरात पेट्रोलींग करीत असतांना सकाळी १०.३५ वाजताच्या सुमारास महागांव जुने बसस्थानक परिसरात असतांना ईसम नामे संदीप श्रीराम राजनकर रा. महागांव यांनी पोलीस उपनिरीक्षक शेळके यांना समक्ष भेटून त्याचे कडे असलेला अत्यावश्यक सेवेसाठीचा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी दिलेली पास दाखवून सदर पास त्याने दिनांक १८ एप्रिल २०२० रोजी अजिंक्य कॅम्प्युटर्सचा चालक अजिंक्य प्रदिप गंगमवार रा.महागांव यास सर्व कागदपत्र देवून बनवून घेतली असल्याचे सांगुन दिनांक १८ एप्रिल २०२० रोजी त्यांचे मोबाईलवर आरटीओ कार्यालयाने इनाडेक्युट क्लॉस ऑफ एमडीएल या कारणासाठी नामंजुर केल्याचा मॅसेज आला असतांनाही अजिंक्य गंगमवार याने पास तयार झाला असल्याचे सांगुन त्यांचेकडून २०० रुपये नगदी घेवून पास दिली असल्याचे व बार कोड स्कॅन केला असता कोणतीही माहीती त्यात दिसत नसल्याचे सांगीतले.
यावरुन पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी सदर बाबतीत सायबर सेल यवतमाळ यांचेकडे खात्री केली असता या प्रकरणी कोणताही प्रस्ताव पोलीस अधिक्षक कार्यालयास दाखल नसल्याचे सायबरसेल यांचेकडून कळताच पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी सदर माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांना दिली. त्यावरुन पो.नि.शिरस्कर यांनी सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून ही बाब वरिष्ठांचे लक्षता आणून देवून स्वत: सदर ठिकाणी खात्री करणे करीता रवाना झाले व पंचासह ईसम नामे अजिंक्य गंगमवार यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने सदरची पास स्वत:चे अजिंक्य कॅम्प्युटर्स , तहसील कार्यालया समोर महागाव येथे असलेल्या संगणकावर तयार केल्याचे व तेथीलच कलर पिं्रटर मधून पिं्रट काढूण दिल्याचे सांगीतले. आरोपी अजिंक्य गंगमवार याचे कडील मोबाई, संगणक, प्रिंटर असे ३५ हजार रुपयाचे साहित्य जप्त करुन आरोपीविरुध्द महागांव पोलीस स्टेशनला भादंवि ४६५, ४६६, ४६८, ४७१, ४७४, ४७६ सहकलम माहिती संप्रषण तंत्राान कायदा २०००चे कलम ६६ (सी) नुसार गुन्हे नोंद करण्यात आले असून नमुद आरोपीने अशा स्वरुपाच्या आणखी बनावट पास तयार करुन दिल्या असल्याची दाट शक्यता असल्याने गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर हे करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांचे मार्गदर्शनात स्था.गु. शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यवतमाळ, पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, पोलीस हवालदार गोपाल वास्टर, मुन्ना आडे, पंकज पातुरकर, मो.ताज, रेवण जागृत सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतामळ यांनी पार पाडली.