Home विदर्भ गोदिया जिल्ह्यातील मंगेझरी येथे वाघाच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू.!

गोदिया जिल्ह्यातील मंगेझरी येथे वाघाच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू.!

72
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्या पासून लाबं असलेल्या गोंदिया जिल्ह्यतील तिरोडा, तालुक्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसापासून बिबट व वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास नागझिरा अभयारण्या लगत असलेल्या मंगेझरी येथील गावालगतच्या जंगलभागात मोहफुल वेचायला गेलेल्या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना समोर आली आहे.
मंगेझरी येथील अनिता संजय तुमसरे असे मृतक महिलेचे नाव आहे. सदर महिला मोहफुल वेचायला कुटूबिंयासोबत गेली असताना वाघाने हल्ला करीत अर्धा किमी ओढत नेले. याची माहिती मितळाताच वन्य़जिव विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केल्या तसेच वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करत मृत देह तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.