ऑटो चालकाचा १६ वर्षीय मुलगा पॉजिटीव्ह..
परिवारातील दोन रिपोर्ट बाकी…
निवास परिसर सील….
मनिष गुडधे
अमरावती – शहरातील नूराणी चौक येथील दोन दिवस आधी मृत पावलेल्या एका ऑटो चालक व्यक्तीच्या मुलाचा कोरोना चाचणी अहवाल positive आला आहे.
सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोविड रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. पुढील तपासणी होत आहेत. दरम्यान, सदर व्यक्तीचा निवास परिसर सील करण्यात आला आहे.
अमरावती शहरातील नुरानी चौक परिसरातील निधन झालेल्या एका व्यक्तीच्या मुलाचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या एका मयत व्यक्तीसह एकूण 6 झाली आहे.
सदर व्यक्तीचा 12 एप्रिलला निधन झाले. निधन झालेल्या व्यक्तीचे वय 53 वर्षे होते. त्यांचा मुलाचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्याचे वय 16 वर्षे आहे. नुरानी चौक परिसरातील एका व्यक्तीचे निधन (होम डेथ) झाल्याची माहिती वैद्यकीय पथकाला मिळाली. त्यामुळे खबरदारी म्हणून या कुटुंबातील सदस्यांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, 2 प्रलंबित आहेत. दरम्यान, प्राथमिक चौकशीनुसार या रूग्णाच्या संपर्कातील एकूण 23 जणांची तपासणी करून त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे. अद्यापही तपासणी सुरू आहेत.
सदर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्याबाबत कार्यवाही महापालिकेच्या पथकांकडून होत आहे.
प्रभावित भागात सॅनीटाईझिंग
आज दिनांक 18 एप्रिल 2020 रोजी खालील प्रमाणे ठिकाणी सॅनिटाईजर द्वारे हैदर पुरा, नुरानी चौक, बाबा चौक, चारा बाजार परिसर,खोलापुरी गेटसमोरील सर्व परिसर, नागपुरी गेट परिसर,हाथीपुरा पूर्ण परिसर, चांदणी चौक, मशीद परिसर हैदारपुरा व हाथीपूरा, एम आय एस स्कूल येथे sodium hypochlorite द्वारे फवारणी करण्यात आली स्वास्थ निरीक्षक उपस्थित होते उपस्थित होते. सदर कार्यवाही मध्ये सहा. वैदकिय अधिकारी डॉ. अजय जाधव,जे.स्वास्थ निरीक्षक श्री.राऊत, श्री. जीवन राठोड,श्री.मनीष नकवाल,श्री.मोहित जाधव उपस्थित होते.
