Home महत्वाची बातमी राज्यात रेड झोन नसलेल्या जिल्ह्यात लवकरच उद्योग धंदे सुरू होणार , ना...

राज्यात रेड झोन नसलेल्या जिल्ह्यात लवकरच उद्योग धंदे सुरू होणार , ना , डॉ , राजेंद्र शिंगणे ,

57
0

कोरोना साठी उपयोगात येणाऱ्या औषधांचा राज्यात मुबलक साठा उपलब्ध ,

अमीन शाह ,

नगर ः “”कोरोनावर अद्याप कोणतेही औषध नसले, तरी त्यासाठी उपयोगात येणाऱ्या औषधांचा राज्यात मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेने अजिबात काळजी करण्याची गरज नाही. राज्यातील रेड झोन वगळता इतर जिल्ह्यांत लवकरच उद्योगधंदे सुरू करण्यात येणार आहेत,” असा विश्‍वास अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद रस्त्यावरील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “”कोरोनावर मात करण्यासाठी दोन महिने तरी विशिष्ट औषध उपलब्ध होणार नाही. सुरवातीच्या काळात सॅनिटायझरचा तुटवडा होता. त्यानंतर सरकारने तातडीने राज्यातील 288 कारखान्यांना सॅनिटायझर बनविण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता तरी सॅनिटायझरचा तुटवडा येणार नाही. फूडच्या बाबतीत बहुतांश कंपन्यांचे उद्योगधंदे राज्याच्या बाहेर आहे. त्यामुळे मजूर उपस्थिती कमी असून, उत्पादनही कमी होत आहे. मात्र, आता सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आगामी काळात कोणत्याही गोष्टीचा तुटवडा भासणार नाही.”
अन्यथा कारवाई
लॉकडाउनच्या काळात अनेकांनी मुदतबाह्य औषधे विकण्याचा प्रयत्न केला होता. त्याला तातडीने आळा घालण्यात आला. यापुढे चढ्या भावाने किंवा मुदतबाह्य औषधे विकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले.