Home मराठवाडा ज्यांना अंथरायला जमीन आणि पांघरायला आभाळ त्यांनी कस लाॅकडाऊन राहायचं ?

ज्यांना अंथरायला जमीन आणि पांघरायला आभाळ त्यांनी कस लाॅकडाऊन राहायचं ?

162

सखाराम बोबडे पडेगावकर यांचा सवाल.

धनगर समाजाच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

परभणी / गंगाखेड – ज्यांना अंथरायला जमीन आणि पांघरायला आभाळ अशी परिस्थिती असणाऱ्या धनगर मेंढपाळ कुटुंबांनी सांगा कसं आणि कुठे लाकडाऊन रहायचं असा सवाल धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक ,परभणी लोकसभा ऊमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी सरकारला विचारला आहे. एकुनच याद्वारे समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचे काम त्यांनी केले.

कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात येतात राज्यासह संपूर्ण देशभर लाॅकडाऊन करण्यात आले. पहिला टप्पा संपण्यापुर्विच दुसऱ्या टप्याची घोषणा करण्यात आली. एकही व्यकती ऊपाशी व गर्दीमध्ये झोपला नाही पाहिजे अशी व्यवस्था शासनातर्फे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. त्यात वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. विविधतेने नटलेल्या आपल्या राज्यात आणि देशात एकमेव जमात अशी आहे की महामारीच्या काळातही घरात लाॅकडाऊन मध्ये राहू शकली नाही. रस्त्यावर फिरणारे भिकारी, बेघर लोकांसाठी शासनाने शासकीय निवारे उभारली. त्यांच्या अन्नधान्याची सोय केली. ऊसतोड कामगार ,मजूर, कारखान्यातील कामगार ,जिनीग मध्ये काम करणारे ,दुसऱ्या राज्यातील मजुरांसाठी शासनाने वेगवेगळ्या योजना राबविल्या. पण याच राज्यात राहून या राज्याच्या मातीशी ईमान बाळगणाऱ्या समाजाकडे शासनासह प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. शासनाच्या वतीने आज पर्यंत मेंढपाळ कुटुंबात जाऊन अन्नधान्याची अथवा आरोग्याची मदत केल्याची बातमी आल्याचं दिसत नाही. कोरोना काळातही रानावनात राहणाऱ्या आणि त्या शेतकऱ्याच्या शेतात उघड्या जमिनीवर झोपणार्या मेंढपाळ कुटुंबाचे हाल मात्र आजपर्यंत ही संपले नाहीत. त्यामुळे या काळात सरकार यांच्या समस्येकडे लक्ष देईल अशी अपेक्षा असतानाही शासनाकडून काहीही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. या मेढपाळ कुटुंबात महिला, वृद्ध आणि लहान बालकांचा समावेश असतो. पण आज पाहतो त्या लेकरांच्या आरोग्याकडे कोणी पाहिलं ना जनावरांच्या. एकूणच शासनाने वेगळ्या अडचणीचा सामना करणाऱ्या या कुटुंबास अन्नधान्य आणि आरोग्याच्या सोयी सवलती द्याव्यात अशी मागणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.