Home मराठवाडा बदनापूर आरोग्य व स्वच्छता सभापती व समाजसेवक संतोष पवार यांनी आपल्या शेतीतील...

बदनापूर आरोग्य व स्वच्छता सभापती व समाजसेवक संतोष पवार यांनी आपल्या शेतीतील गहू किराणा सामान व तांदूळ अशी किट तय्यार करून केले वाटप ,

129

इंसानियत अभि जिंदा है ???

सययद नजाकत ,

बदनापूर, दि. 14 (प्रतिनिधी): कोरोना रोगाचा प्रादूर्र्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे रोजंदारी कामगार व हातावरचे काम करणाऱ्यांवर या संकट काळात शहरातील आरोग्य व स्वच्छता सभापती व समाजसेवक संतोष पवार यांनी थेट आपल्या शेतीतील तयार झालेला नवा गहूच वाटपासाठी दिला असून गहू, किराणा सामान व तांदूळ अशा किट तयार करण्यात येऊन वाटप करण्यात येत आहेत. या साठी गहू व तांदूळ असे 11 क्विंटल धान्याच्या कीट त्यांनी तयार केलेल्या आहेत.

कोरोना रोगाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. बदनापूर येथील प्रशासनाने शहरातील जिवनावश्यक वस्तूंच्या दुकांनानाही सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत उघडण्याची परवानगी दिलेली आहे. या संचारबंदी काळात घरातून बाहेर न निघण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या परिस्थितील बदनापूर शहरातील कित्येक मजूरी काम करणारे, रोजच्या रोज मजुरी करून पोट भरणाऱ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. सध्या सर्व कामे बंद असल्यामुळे या लोकांवर थेट उपासमारीची वेळ आलेली असल्याचे दिसून येत आहे. विविध सामाजिक संस्था व काही दानशूर या लोकांना अन्नधान्य पुरवठा करत असल्याचे चित्र आहे, तरी हे प्रयत्न अपुरे असल्याचेच दिसून येत असतानाच बदनापूर येथील नगर पंचायतचे आरोग्य व स्वच्छता सभापती संतोष पवार यांनी गावातील अशा कुटुंबांचे परिस्थितीची जाणीव ज्या कुटुंबांना खरोखर अन्नधान्याची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 5 किलो गहू, 2 किलो तांदूळ, 1 किलो खाण्याचे गोडे तेल, 5 बिस्कीट पुडे, 1 किलो मीठ, 1 किलो साखर, चहा पुडा, 1 डेटॉल साबण या एकंदर सामानाची किट बनवण्यात आली. विशेष म्हणजे एकूण 11 क्विंटल गहू व तांदूळ या वेळी उपयोगात घेऊन त्याच्या कीट बनवण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे हा गहू त्यांच्या शेतीतील असून नुकताच तयार करण्यात आलेला आहे. आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी आपला नवा तयार झालेल्या गहू व इतर किराणा सामानाच्या कीट तयार केल्या असून या कीटचे गरजू कुटुंबाना स्वयंसेवकांच्या हस्ते कुटुंबांच्या घरी पाठवून प्रसिध्दीही टाळली. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी स्वयंसेवकांना सांगून कोणत्याही कुटुंबांचे वाटप करतानाचे फोटो काढू नका असे सांगून कीटवर कोणतेही नाव न टाकता हे वाटप केलेले आहे. या अन्नधान्यात शहरातील कित्येक कुटुंबांचे काही दिवस जरी भागणार असले तरी लॉकडाऊन वाढल्याचया पार्श्वभूमीवर पवार हे या कुटुंबांच्या संपर्कातच राहणार असून आपत्कालिन परिस्थितीत त्यांना पुन्हा मदत मिळवून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला असून शहरातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन गरजुना मदत करावी असे आवाहन संतोष पवार यांनी केले आहे.