Home राष्ट्रीय कर्तव्यावरील आरोग्य कर्मचाऱ्यास नंदूच्या डीबी पथकाकडून बेदम मारहाण…व्हिडीओ व्हायरल…

कर्तव्यावरील आरोग्य कर्मचाऱ्यास नंदूच्या डीबी पथकाकडून बेदम मारहाण…व्हिडीओ व्हायरल…

48
0

◆जखमी मुधोळकरची पोलिसां विरोधात वरिष्ठांकडे लेखी तक्रार..कार्येवाही शून्य

वैधकीय अधिष्ठाताची भूमिका संशयास्पद..

यवतमाळ / पुसद ( हरीश कामारकर ) – दि.14 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजताचे सुमारास स्थानिक उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका अधिकारी कैलास गणपत मुधोळकर हे आरोग्य विभागाच्या ओळ्खपत्रासह पेट्रोल भरण्याकरिता जात असतांना त्यांना डीबी पथकातील कर्मच्याऱ्याकडून बेदम मारहाण करण्यात अली. मारहाण करणाऱ्या बक्कल नंबर 461 उत्तम चव्हाण सह प्रचंड रक्तस्त्राव झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला असून सर्वत्र पोलिसांची नाचक्की होत आहे. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने रक्तस्त्राव सांडलेल्या ठिकाणी डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी भरपूर पाणी आणून टाकले हे विशेष..
कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून जनतेच्या रक्षणार्थ अहोरात्र राबणाऱ्या पोलिसांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे मात्र त्यांच्या जोखमीच्या कर्तबगारीवर काळिमा फासण्याचा प्रकार येथील नंदू चौधरीच्या डीबी पथकाने केला आहे. एखाद्या आरोपीस मारणार नाही एवढा बेदम मार निष्पाप आरोग्य कर्मचाऱ्यांस मारून आपली चूक लक्षात येताच नंदू पथकाने जखमी मुधोळकराना शासकीय रुग्णालयात न नेता खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व तेथील डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन लेटरवर जखमी रुग्णांचे नाव पत्ता न टाकताच औषधी लिहून घेतली व कैलास मुधोळकर याना छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणून सोडण्यात आले. एरवी पोलीस विभागाकडून जखमींना शासकीय रुग्णालयातच उपचारार्थ नेले जाते मग मुधोळकर हे आरोग्य कर्मचारी असूनही त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा पुळका डीबी पथकास कसा काय आला हे न उलगढणारे कोडेच आहे.
जखमी कैलास मुधोळकर यांनी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे वैधकीय अधिष्ठाता डॉ. हरिभाऊ फुफाटे यांचेकडे लेखी तक्रारीद्वारे अपबीती कथन करीत मारहाण करणाऱ्या संबधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कार्येवाहीची मागणी देखील केली..मात्र पोलीस विभागातील कर्मच्याऱ्यांच्या दबावामुळे आपणास चुकीने पोलिसांची काठी लागल्याचा व्हिडीओ पीडित कैलास मुधोळकर यांच्याकडून व्हायरल करविण्यात आला.
सकाळी 9 ते दुपारी 3 वाजे दरम्यान जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना मुभा असल्यामुळे कुणाची गाडी थांबवून चौकशी न करता बेदम मारहाण करणे ही कुठली पोलिसिंग आहे असा संतप्त सवाल कोरोनाला हरविण्यासाठी अत्यावश्यक सेवेत रात्रंदिवस झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील अधिष्ठाता व कर्मचाऱ्यांतील अंतर्गत वादामुळे जखमी मुधोळकर यांचे तक्रारींवर अधिष्ठाता डॉ. हरिभाऊ फुफाटे यांनी अद्याप कोणतेही ठोस पाऊण उचलेले नाही.त्यामुळे कैलास मुधोळकर यांना मारहाण करणाऱ्यांना तसेच डीबी पथकाच्या प्रमुखावर कार्येवाही होईस्तोवर पुढील काळात कामबंद आंदोलन करण्याचा प्रस्ताव आरोग्य कर्मचारी संघटनेच्या विचाराधीन असल्याचे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून कळते.

दंगलीतील आरोपी ते डीबी प्रमुख:-
सण 2009 च्या जातीय दंगलीतील आरोपी असलेले बडतर्फ पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदू चौधरी हे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आशीर्वादाने स्थानिक शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे प्रमुख आहेत. ते स्थानिक रहिवासी असूनही मागील 4 वर्षांपासून येथील शहर ठाण्यात ठाण मांडून नियुक्तीवर असल्याने पोलीस विभागाच्या या शिरजोर कळसाची खमंग चर्चा शहरात सुरू आहे. आपण एसपी साहेबांचे खास असल्याची बतावणी करून इतर कर्मचाऱ्यांना धाकात ठेवन्याचा फंडा नंदू नेहमी वापरतो हे विशेष..ठाण्यातील एकाडे नामक एका सहायक पोलिस निरीक्षकाची तसेच तत्कालीन पोनी धनंजय सायरे यांची यवतमाळ येथे उचलबांगडी माझ्यामुळेच झाल्याचे नंदू छाती ठोकून नेहमी सांगत असतो..लॉकडाऊन काळात अनेक निष्पाप नागरिकांना वेठीस धरणे,मारहाण करणे तसेच स्थानिक रहिवाशी असल्याचा फायदा घेत अनेक अवैध व्यवसायिकांशी डीबी प्रमुखाचे लागेबांधे असल्याचे सर्वश्रुतच आहे.एकंदरीत डीबी पथक संपुष्टात आणून हेडकॉन्स्टेबल नंदू चौधरी याना इतरत्र हलविण्याची मागणी सामान्य नागरिकांतून केली जात आहे.

Unlimited Reseller Hosting