Home विदर्भ मास्क वाटप करून केले भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन,

मास्क वाटप करून केले भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन,

106
0

देवानंद खिरकर ,

हिवरखेड ,

जगभरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे
अशा परिस्थितीत सर्वांनी लाँकडाऊन व्हावे त्याचबरोबर साबन,हँन्डवाँशचा वापर करून हात स्वच्छ धुवावे,सोशियल डिस्टंशिंग हे नियम पाळायचे आहेत जर अतिमहत्वाचे काम असल्यासच घरा बाहेर पडावे व बाहेर निघतांना तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधावा अश्या सुचना शासनस्तरावरून देण्यात येत आहेत.
मास्कचा वापर करणे अतिमहत्वाचा आहे ही बाब लक्षात घेऊन महामानव,भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीनिमित्य स्व.डाँ.का.शा.तिडके स्मृती प्रतिष्ठान,हिवरखेडचे सस्थांपक अध्यक्ष श्री.क्रीष्णाभाऊ तिडके यांच्या कल्पनेने प्रतीष्ठानचे अध्यक्ष ऊमेश तिडके यानी हा कार्यक्रम मास्कचे वाटप करून महामानव,भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन राबविण्यात आला,
यावेळी डाँ. रामजी तिडके यांनी आरोग्यविषयक चांगल्या सवयींविषयी जनजाग्रुती करून मास्कचा वापर करणे स्वत:करिता व इतरांकरिता कसे लाभदायक आहे याबाबत जनजाग्रुती केली.
स्व.डाँ.का.शा.तिडके प्रतिष्ठाणचे सक्रिय सदस्य श्री.प्रकाश बाभुळकर यांनी विनामुल्य कापडी मास्कची शिलाई करून देऊन कोरोणा या जिव घेण्या व्हायरस विरूद्धच्या लढाईत आपला खारीचा वाटा उचलला.
कोरोना या महामारीला हरवण्यासाठी एक पाऊल
म्हणुन स्व.डाँ.का.शा.तिडके प्रतिष्ठाणच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठाणचे प्रसिद्दि प्रमूख बाळकृष्ण नेरकर सदस्य,पंकज तिडके! रवी मानकर, गजानन भटकर,सुधाकर डालके,संतोष शिंगणे,प्रकाश बाभुळकर,उमेश तिडके,राजेश पिसोळे, यांनी सहकार्य केले.

Unlimited Reseller Hosting